ताज्या घडामोडी

मोशी टोल नाका ही शिंदे सरकारची 50 खोके वसुली योजना आहे काय ?  आपचा सवाल..

टोलनाका पुन्हा: एकदा सुरू केला तर त्याला आम आदमी पार्टी चा तीव्र विरोध राहील. आपचे भोसरी कार्याध्यक्ष.मंगेश आंबेकर..

Spread the love

मोशी टोल नाका ही शिंदे सरकारची 50 खोके वसुली योजना आहे काय ?  आपचा सवाल..

आवाज न्यूज : गुलामअली भालदार, चिंचवड प्रतिनिधी, ९ जानेवारी.

टोलनाक्याचाकालावधी संपल्यावर बंद करण्यात आलेला मोशी टोलनाका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पार्टीच्या भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष मंगेश आंबेकर यांनी हा टोलनाका सुरू करून सामान्य जनतेच्या कमाईवर डल्ला मारून कथित आमदार खरेदी व्यवहारातील खोके वसुलीचा कार्यक्रम राबवत आहे काय ?  असा सवाल केला.

मोशी टोल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काही वर्षांपूर्वी कालावधी संपल्यावर हा टोल बंद करण्यात आला होता. परंतु तो पुनः एकदा सुरू केला तर त्याला आम आदमी पार्टी चा तीव्र विरोध राहील.

कारण सध्याची भोसरी ते चाकण या दरम्यानच्या वाहतूक समस्यांचा विचार केला तर खुप गंभीर आहे. मोशी गावातील चौकात वाहतुक कोंडी नित्याचीच झाली असताना हा टोल नाका सुरू केला तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी वाढणार आहे. त्यामुळे आधीच ट्रॅफिक जॅमला त्रासलेल्या सर्वसामान्य नागरिकांना विशेषकरून चाकण आणि भोसरी MIDC मध्ये काम करणाऱ्या कामगारांना आगीतून फुफाट्यात ढकलण्यासारखे आहे, यातून त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होणार आहे.

त्यामुळे या टोल सुरू करण्याला आप चा पूर्ण विरोध आहे. वेळ प्रसंगी आंदोलन करावे लागले तरी चालेल पण हा टोल सुरू करू देणार नाही असे आपच्या भोसरी कार्याध्यक्ष मंगेश आंबेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!