नगरपरिषद हद्दीत भुयारी गटर काम प्रगतीपथावर !
नगरपरिषद हद्दीत भुयारी गटर काम प्रगतीपथावर !
आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ७ जानेवारी.

नगरपरिषद हद्दीत भुयारी गटर काम प्रगतीपथावर आहे. लोणावळा नगरपरिषद इमारतीसमोर व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे समोरून पोलिसस्टेशन समोर हे काम सध्या चालू आहे.सुमारे दोन ते आडीच फूट व्यासाची सिमेंट पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.

अत्यंत वेगात काम सुरू आहे.या कामासाठी किती निधी आला , हे मुख्याधिकारी यांचेशी संपर्क न झाल्याने समजू शकले नाही.! भांगरवाडी येथेही या कामाची पूर्तता करण्यात आल्याने त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे.

कृष्णाई हाॕटेल ते रेल्वेगेट कडे मारूती मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर माञ तीन चार दिवस खडी टाकून ठेवली , अद्याप त्यावर डांबर वा काँक्रीटीकरण न केल्याने वाहनचालकांना कसरत करीतच ये जा करावी लागत आहे..! याकडे तातडीने प्रशासनाने लक्ष घालून काम अर्धवाट न ठेवता पुर्ण करावे , अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे..



