ताज्या घडामोडी

रेशनवरील मोफत धान्य योजनेस मुदतवाढ..

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत रेशन दुकानांमधून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे.

Spread the love

रेशनवरील मोफत धान्य योजनेस मुदतवाढ..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ३ जानेवारी.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत रेशन दुकानांमधून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. मागील डिसेंबर महिन्याचे धान्य न घेतलेल्या लाभार्थ्यांनी जानेवारीसह दोन्ही महिन्यांचे धान्य मोफत घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ, दोन रुपये दराने गहू आणि एक रुपये प्रतिकिलो दराने भरडधान्य वितरित करण्यात येते. तथापि केंद्र सरकारने २८ डिसेंबर रोजी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार रेशन दुकानांमधून २०२३ या वर्षांत मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!