ताज्या घडामोडी

नवीन समर्थ विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न, विद्यार्थ्यांनी केले १५० प्रकल्पांचे सादरीकरण.

तळेगाव दाभाडे: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love

नवीन समर्थ विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न, विद्यार्थ्यांनी केले १५० प्रकल्पांचे सादरीकरण.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी ३१ डिसेंबर.

तळेगाव दाभाडे: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघा चे समन्वयक वसंत बुरांडे होते. तर अध्यक्षस्थानी दीपक बाळसराफ होते .
या विज्ञान मेळाव्यात विजय जोरी सर व वसंत बुरांडे सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

यावेळी शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा, शाळेचे प्राचार्य संजय वंजारे सर ,पर्यवेक्षक भाऊसाहेब आगळमे सर ,जेष्ठ अध्यापक रेवप्पा शितोळे , सविता चव्हाण, शारदा वाघमारे , विजया देशपांडे, प्रयोगशाळा सहाय्यक संजय कसाबी उपस्थित होते. सरस्वती पूजन व प्रतिमा पूजन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान अध्यापिका वंदना मराठे यांनी केले.सदर विज्ञान मेळाव्यात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी 150 विविध प्रकल्प ठेवले होते ते पाहण्यासाठी पैसाफंड प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मेळाव्यास भेट दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे यांनी केले. यावेळी परीक्षकांनी प्रकल्पाचे विविध गटांतून क्रमांक काढण्यात आले होते या सर्व बक्षीसांचे वितरणाचे काम मिरा शेलार व नेहा बारमुख केले.या मेळाव्यासाठी शाळेतील सर्व विज्ञान व गणित अध्यापकांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी संपन्न केला.कार्यक्रमाचे आभार गायत्री जगताप यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!