ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड येथील शिवमुद्रा फाउंडेशन व प्रयत्न सोशल फाउंडेशन च्या तरुणांनी राबवले “रक्तदान शिबिर..

रक्तदान केलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिवमुद्रा फाउंडेशन व प्रयत्न सोशल फाउंडेशन द्वारे तुळशी चे रोप व प्रमाणपत्र देण्यात आले.

Spread the love

पिंपरी चिंचवड येथील शिवमुद्रा फाउंडेशन व प्रयत्न सोशल फाउंडेशन च्या तरुणांनी राबवले “रक्तदान शिबिर..

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, ३१ डिसेंबर.

“रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान” असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्त पेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत,अशा प्रसंगी पिंपरी चिंचवड येथील “शिवमुद्रा फाउंडेशन” व “प्रयत्न सोशल फाउंडेशन” च्या तरुणांनी संत तुकाराम महाराज उद्यान, प्राधिकरण येथे रविवारी (दी.२४) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

याठिकाणी ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान केलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिवमुद्रा फाउंडेशन व प्रयत्न सोशल फाउंडेशन द्वारे तुळशी चे रोप व प्रमाणपत्र देण्यात आले.

प्रणव नारायण ढवळे, कौशल कैलास जयगुडे, हर्ष एकनाथ सरोदे, जयेश मोरे, अजय मोरे. यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!