ताज्या घडामोडी
भाजप नेते गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार थेट रूग्णालयात…
भाजप नेते गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार थेट रूग्णालयात…
आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २६ डिसेंबर.

भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली.

गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरद पवार यांनी नुकतीच रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.



