माजी खासदार किरीट सोमय्या यांचे लँड माफिया बरोबरचे फोटो सोशलमिडीयावर प्रसारित केल्याप्रकरणी पोरवाल याचेवर अदखलपाञ गुन्हा…
घटनेमधे भा.द.वि.कलम ४९९,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांचे लँड माफिया बरोबरचे फोटो सोशलमिडीयावर प्रसारित केल्याप्रकरणी पोरवाल याचेवर अदखलपाञ गुन्हा.
आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २४ डिसेंबर.

पुरावा नसताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे व माजी नगरसेवक नितीन विश्वनाथ आगरवाल यांचे लँड माफियासोबत फोटो सोशल मिडीयावर प्रसारित केल्याप्रकरणी पोरवाल याचेवर अदखलपाञ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी माजी खासदार यांचेकडून लोणावळा शहर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे,असल्याने लोणावळा शहरात खळबळ माजली आहे.
लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रकाश मिश्रीलाल पोरवाल ,( रा -एकविरा निवास , भुशीगाव , ता-मावळ, जिल्हा -पुणे ),यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ता.६ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता सामाजिक माध्यमावर तारखेला , वेळी व ठिकाणी आरोपी यांनी फिर्यादी किरीट सोमय्या यांचे सोबतचा फोटो सामाजिक माध्यमावर प्रसारित करून त्यावर मावळ तालुक्यातील लँड माफिया युसूफ लकडावाला यांच्या हस्तक माजी नगरसेवक नितीन विश्वनाथ आगरवाल बेकायदेशीर गौण खनिज उत्खणणाबाबत माजी खासदार किरीट सोमय्या यांचेसोबत त्यांच्या निवासस्थानी चर्चा झाली आणि सदर प्रकरणामधे संपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई करणार , असे अश्वासन दिले आहे.
अशा आशयाचा मजकूर प्रसारित केल्याने व माजी नगरसेवक नितीन आगरवाल यांचे युसूफ लकडावाला यांचे कोणतेही प्रकारचे संबंध असल्याचा पुरावा नसताना फिर्यादी यांचे सोबतचे फोटो सामाजिक (सोशल मिडियावर ) माध्यमावर प्रसारित करून फिर्यादी .सोमय्या व .आगरवाल यांची अब्रूनुकसान होईल,असे कृत्य केले आहे, असा मजकूर असल्याचा अदखलपाञ गुन्हा लोणावळा शहर पोलिसस्टेशनचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली तक्रार अर्ज १४३२/२२,१८८/२२, १८३१/२२,१८१८/२२,दाखल झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे या घटनेमधे भा.द.वि.कलम ४९९,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



