ताज्या घडामोडी

वानप्रस्थाश्रम तळेगाव दाभाडे ( स्टेशन ) येथे कु.अवनी परांजपे आणि कु.मधुश्री शेंडे या बाल कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न..

या दोन्ही बाल किर्तनकारांनी सुमारे पावणे दोन तास त्यांच्या अमोघ वाणीने सर्व रसिक प्रेक्षकांना किर्तनाद्वारे मंत्रमुग्ध करून जागेवर खिळवून ठेवले होते.

Spread the love

वानप्रस्थाश्रम तळेगाव दाभाडे ( स्टेशन ) येथे कु.अवनी परांजपे आणि कु.मधुश्री शेंडे या बाल कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी,१५ डिसेंबर.

कलापिनी नाट्यसंस्था व वानप्रस्थाश्रम संस्था तळेगाव दाभाडे,ता.मावळ, जि.पुणे यांचे संयुक्त विद्यामानाने कै. डॉ.मंगलाताई शंकरराव परांजपे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ वानप्रस्थाश्रमात कु.अवनी परांजपे आणि कु.मधुश्री शेंडे या बाल कीर्तनकारांचे कीर्तन सोमवार दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते.

कु.अवनी परांजपे व मधुश्री शेंडे या दोन्ही बाल किर्तनकारांनी सुमारे पावणे २ तास त्यांच्या अमोघ वाणीने सर्व रसिक प्रेक्षकांना किर्तनाद्वारे मंत्रमुग्ध करून जागेवर खिळवून ठेवले होते.कीर्तनामध्ये दोन्ही कीर्तनकारांनी अनेक प्रमानाद्वारे उदाहरणे देऊन संतांची महती विषद केली.

याच कार्यक्रमामध्ये कलापिनी नाट्यसंस्थेचे मुख्य विश्वस्त डॉ.अनंत शंकरराव परांजपे यांचे दिनांक ११ डिसेंबर च्या वाढदिवसाचे औचित्य साधून, कार्यक्रमास उपस्थित असलेल्या डॉ. अनंत परांजपे यांच्या सुविद्य पत्नी डॉ.अश्विनी परांजपे यांचेसह वाढदिवसाचा छोटे खाणी कार्यक्रम साजरा करण्यात आला.

आश्रमातील आजी आजोबांनीही कीर्तनाचा मनमुराद आनंद घेतला. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन मा.ऊर्मिलाताई छाजेड यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामवंत कवी ,लेखक, कीर्तनकार व संत साहित्याचे गाढे अभ्यासक साप्ताहिक अंबर चे संपादक ह.भ.प.सुरेशजी साखवळकर हे होते. अशी माहिती मा. तहसीलदार रामभाऊ माने यांनी आवाज न्यूजला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!