ताज्या घडामोडी

ज्ञान- सेवेचा वारकरी- होई होई कैवल्याचा धनी!

होय मित्रांनो ज्ञान आहे- पण सेवा नाही! आणि सेवा आहे- पण ज्ञान नाही! त्याला आत्मज्ञान कधीच प्राप्त होत नाही! म्हणून तो कैवल्याचा धनी होऊ शकत नाही! डॉ शाळीग्राम भंडारी..

Spread the love

ज्ञान- सेवेचा वारकरी- होई होई कैवल्याचा धनी!

आवाज न्यूज : डॉ शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे, ९ डिसेंबर.

होय मित्रांनो ज्ञान आहे- पण सेवा नाही! आणि सेवा आहे- पण ज्ञान नाही! त्याला आत्मज्ञान कधीच प्राप्त होत नाही! म्हणून तो कैवल्याचा धनी होऊ शकत नाही! मी या जगात कशासाठी आलो? इथून पुढे मी कुठे जाणार आहे ? त्याचं परिपूर्ण ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान! म्हणजेच कैवल्याचा धनीहोण असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात! चला तर मग त्या संदर्भात आणखी विचार मंथन करूया- काल सहजच माझ्या मनात विचार आला की जगात ज्ञानी व्यक्ती कोणाला म्हणावं?- माझ्या मनातील या प्रश्नाच उत्तर मी अनेक ग्रंथ- संदर्भ- कीर्तनकार- प्रवचनकार यांना भेटून सुद्धा मला मिळालं नाही! किंबहुना माझं समाधान झालं नाही! सर्वप्रथम मी विचार केला की एखादी व्यक्ती खूप शिकलेली आहे- ज्याने वेद- उपनिषद- भगवद्ग गीता- ज्ञानेश्वरी- तुकारामाची गाथा- अशा अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे! विविध विषयात डॉक्टरेट मिळवलेली आहे ! अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे! अशा व्यक्तींना ज्ञानी’ म्हणावं का? मग विद्वान आणि विद्वत्तेची निश्चितपणे व्याख्या काय आहे? अशा स्वरूपाचे अनेक निकष मी माझ्या मनाने लावून पाहिले!  तरी ज्ञानी या शब्दाची स्पष्ट व्याख्या माझी मलाच करता येत नव्हती!

शेवटी मीच एका निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो की- एखादी व्यक्ती एखाद्या विषयाचा सखोल अभ्यासाचा ध्यास घेऊन आयुष्यभर जर कार्यरत राहिली आणि त्या क्षेत्रातील त्याचा” शब्द हा शेवटचा शब्द “अशी समाज मान्यता जर -त्या व्यक्तीला मिळाली तर- खऱ्या अर्थान ज्ञानी म्हणून त्या व्यक्तीला समाज मान्यता देऊ शकतो!- यातूनच काही ठळक मुद्दे लक्षात घेऊन माझ्या असे लक्षात आले की काही विषयांमध्ये अत्यंत अधिकारवाणीने जे बोलू शकतात आणि ज्यांचं अभ्यासपूर्ण बोलणं लोकांवर प्रभाव टाकू शकत अशा लोकांना ज्ञानी म्हणायला काही हरकत नसावी! दुसरा मुद्दा आपल्यातील दूरगुणांकडे व्यापक दृष्टिकोनातून दुर्लक्ष करून आपल्यातीलच सद्गगुणांकडे लक्ष देऊन आपल्याकडून सामाजिक योगदान प्राप्त करून घेणार्‍या लोकांना ज्ञानी म्हणण्यास काहीच हरकत नाही! तिसरी गोष्ट आपल्यातील षड्रिपू म्हणजेच काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ अशा दुर्गुणांना स्वतःपासून जो ठरवून दूर ठेवू शकतो अशा व्यक्तींना देखील आपण ज्ञानी म्हणू शकतो!

आजूबाजूला असणाऱ्या मोहाना बळी न पडणाऱ्या व्यक्तींना देखील आपल्याला ज्ञानी म्हणता येईल!- कारण असं व्यक्तिमत्व हे जन सामान्यांच्या हितासाठी उपयुक्त ठरणार असच असत!- मोहावर विजय मिळणाऱ्या अश्या व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक विकासातून आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त आणि आदर्श ठरू शकतात!म्हणून अशा व्यक्तींना ज्ञानी म्हणायला कोणाचीही हरकत नसावी! वरील विवेचनावरून आपण स्वतः आत्मपरीक्षण करून आपण यात बसतो आहोत का?-ज्ञानी म्हणूऊन घेण्यास आपल्यात काही कमतरता आहे का?- आपल्यातील ती न्यूनता आपल्याला भरून काढता येईल का?- हाच आपल्या आजच्या चिंतनाचा मुख्य गाभा होता तो आपल्या लक्षात आलेला आहे !..’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!