ताज्या घडामोडी

बाळासाहेब लांडगे यांचा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा निर्णय महाराष्ट्रातील पैलवानांसाठी घातक – पै. संदीप भोंडवे..

बाळासाहेब लांडगे यांना सर्व नियम माहीत असताना बाळासाहेब लांडगे यांचा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा हट्ट महाराष्ट्रातील कुस्तीगीरांसाठी भविष्यात धोक्याची घंटा ठरु शकतो ...

Spread the love

बाळासाहेब लांडगे यांचा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा निर्णय महाराष्ट्रातील पैलवानांसाठी घातक – पै. संदीप भोंडवे..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आवाज न्यूज : मुळशी प्रतिनिधी, ८ डिसेंबर..

बाळासाहेब लांडगे यांना सर्व नियम माहीत असताना बाळासाहेब लांडगे यांचा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा हट्ट महाराष्ट्रातील कुस्तीगीरांसाठी भविष्यात धोक्याची घंटा ठरु शकतो …

भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेस दिनांक २६ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून बाळासाहेब लांडगे यांना त्यांची चौकशी सुरु करण्यासंदर्भात सुचना केल्या… बाळासाहेब लांडगे यांच्या विरोधात चौकशी सुरु असल्याने चौकशी संपवून निर्णय देत पर्यंत त्यांना कोणतेही स्पर्धा व निवड चाचणी घेण्याचे अधिकार ठेवले नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्पर्धा व निवड चाचणी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर अस्थाई समितीची नेमणूक करण्यात आली व समितीचे चेअरमन.  संजय सिंह यांना सर्व स्पर्धा व निवड चाचणी घेण्याचे अधिकार देण्यात आले.

त्यामुळेच दिनांक २९ व ३० नोव्हेंबर रोजी वारजे येथे राष्ट्रीय स्पर्धेची निवड चाचणी, संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन अस्थाई समितीच्या लेटरहेडवर महाराष्ट्राचा कुस्ती संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे …

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्याचे महापौर  मुरलीधर मोहोळ यांना देऊ केल्या असुन दिनांक ११ ते १५ जानेवारी दरम्यान कोथरूड येथे होत आहेत… सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अस्थाई समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेस संलग्न असलेल्या ( डिसेंबर २०१९मध्ये भोसरी येथे झालेल्या निवडणूकीत सहभाग घेतलेल्या ) ४५ शहर / जिल्हा कुस्तीगीर संघाना पत्र काढणार आहे .

दिनांक २६ नोव्हेंबर रोजी भारतीय कुस्ती महासंघाने जे परीपत्र जारी केले आहे त्यामध्ये बाळासाहेब लांडगे यांनी जाहीर केलेल्या स्पर्धेत कोणी सहभागी होऊ नये अशा स्पष्ट सुचना केल्या असुन कोणी अशा स्पर्धेत सहभागी झाले तर त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची सुचना करण्यात आली आहे …

असे असताना बाळासाहेब लांडगे यांनी जाणुन बाजुन या स्पर्धा घेतल्या व या स्पर्धेत कोणी कुस्तीगीर सहभागी झाला व भारतीय कुस्ती महासंघाने परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे त्या सहभागी कुस्तीगीर कारवाई झालीच तर यास जबाबदार कोण ?

मी महाराष्ट्रातील सर्व कुस्तीगीरांना विनंती करतो की भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने प्रत्येक जिल्हामध्ये एकच निवड चाचणी होणार असुन आपण त्या निवड चाचणीमध्ये सहभागी व्हावे … दिनांक ११ ते १५ जानेवारी रोजी कोथरूड , पुणे येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असुन आपण आपल्या शहर/जिल्हा कुस्तीगीर संघांमधुन सदर स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे ..

ज्या राज्य स्पर्धेस भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता नसेल कृपया त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपले भविष्य धोक्यात आणु नये. असे आवाहन पै.संदीप उत्तमराव भोंडवे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!