ताज्या घडामोडी

शेततळ्यातील पाच टन मासे मृत्युमुखी; राजवर्धन पाटील यांची घटनास्थळाला भेट

Spread the love

इंदापूर : येथील पळसदेव मधील शेलारपट्ट्याचे शेतकरी संजय शेलार यांच्या शेततळ्यात अज्ञातांनी विषारी औषध टाकल्यामुळे सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले आहेत.

शेलार यांचे शेलारपट्टा भागात शेततळे आहे. त्यांनी आठ महिन्यांपूर्वी तळ्यात रूपचंद जातीचे ३० हजार बीज सोडले होते. परंतु  अज्ञात व्यक्तीने तळ्यात विष टाकल्याने मासे मृत्युमुखी पडले. सोमवारी सकाळी शेलार माशांना खाद्य देण्यात गेले असता सदर प्रकार समोर आला.

यानिमित्ताने निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली.या भेटीदरम्यान  पाटील यांनी शेततळ्याची पाहणी करून शेलार यांच्याशी चर्चा केली व त्यांना दिलासा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!