संविधान दिनाचे औचित्य साधून सरकारच्या १५००० मराठी व उर्दू माध्यमाच्या सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा पुण्यात, शिंदे फडणवीस सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला..
संविधान दिनाचे औचित्य साधून सरकारच्या १५००० मराठी व उर्दू माध्यमाच्या सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा पुण्यात, शिंदे फडणवीस सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला..
आवाज न्यूज: पुणे प्रतिनिधी, १ डिसेंबर.

संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान बचाव च्या कार्यक्रमात सरकारच्या १५००० मराठी व उर्दू माध्यमाच्या सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा जाहिर निषेधार्थ पुण्यातील गुडलक चौक,येथे सेवादल महाराष्ट्र, व अखिल भारतीय समाजवादी शिक्षक सभा,महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षा वैशालीदीदी लालसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या कल्याणासाठी, शांतता आणि न्यायासाठी चळवळ घेण्यात आली .
त्यावेळेस उपस्थीत, जावडेकर सर, शबिरजी शेख, आबिदभाई शेख, अय्युब शेख, आपटे मॅडम, तशेच महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षा वैशालीदीदी लालसिंग परदेशी , महीला भगिनींना व पुणे परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला .