पिछलीहील येथील बंगल्याचे स्विमींगपूलमधे बुडालेल्या दोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू.
लोणावळा शहर पोलिसांनी आकस्मात आपघाती मृत्यू अशी सी.आर.पी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.
पिछलीहील येथील बंगल्याचे स्विमींगपूलमधे बुडालेल्या दोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू.
आवाज न्यूज : लोणावळा ता.२७ (प्रतिनिधी )

पिछलीहील येथील बंगल्याचे स्विमींगपूलमधे बुडालेल्या दोन वर्षाच्या बालिकेचा आज सकाळी मृत्यू झाला.
हानियाझैरा मोहम्मदनदिन सैय्यद (वय-१वर्षे ११ महिने ) ,रा-प्लॕट नंबर ५०३, मैसिमा बी , कासाबेला गोल्ड पलवा , डो़बिवली ) आसे मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे.खबर देणार मृत बालिकेचे वडील मोहम्मदनदिन कैसरहुसेन सैय्यद (वय-३१,रा प्लॕट नंबर ५०३, मैसिमा बी , कासाबेला गोल्ड पलवा , डो़बिवली ) , यांनी दिलेल्या खबरवरून लोणावळा शहर पोलिसांनी आकस्मात आपघाती मृत्यू अशी सी.आर.पी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.

याबाबत लोणावळा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील काही लोक मिर्झा विला बंगलो , पिछलीहील ,बार्क हाॕटेलचे पाठीमागे , खंडाळा , लोणावळा , ता-मावळ,जिल्हा -पुणे ) येथे रहायला आले असताना सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सकाळ चा नाष्ठा करत असताना अचानक बाहेरून ओरडण्याचा आवाज आला.
मुलगी हानियाझैरा मोहम्मदनदिन सैयद (वय-१वर्षे आकरा महिने , )ही स्विमिँग पूलचे पाण्यात पडलेली व बुडालेली दिसली.त्यानंतर आम्ही तिला पाण्याबाहेर काढले व उपचारासाठी संजिवनी रूग्णलयात दाखल केले.तेथील वैद्यकीय आधिकारी यांनी हानियाझैरा सैय्यद ही मृत्यूमुखी पडल्याचे घोषित केले.
यावेळी लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक श्री.मुजावर यांनी अकस्मिक आपघाती मृत्यू सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे नोंद केली . पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक मुजावर करीत आहे.
स्विमिँग पूलमधे बुडून मृत्यू वा विजेचा धक्का लागून मृत्यू ची तिसरी घटना ; लोणावळा परिसरात स्विमिँग पूलमधे यापूर्वी दोन अपघातात दोन बालकांचे मृत्यू झाले असून लोणावळा नगरपरिषद याबाबत कोणती ठोस भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे….



