ताज्या घडामोडी

भारत निवडणूक आयोगामार्फत दि. ९ नोव्हेंबर २०२२ ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, विजयकुमार सरनाईक. यांनी नागरिकांना व सर्व राजकीय पदाधिकारी यांना आवाहन केले आहे..

Spread the love

आवाज न्यूज: तळेगांव दाभाडे, ११ नोव्हेंबर.

तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना व सर्व राजकीय पदाधिकारी यांना आवाहन करण्यात येते की, भारत निवडणूक आयोगामार्फत दि. ९ नोव्हेंबर २०२२ ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करून व दि. १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकानुसार नवीन मतदार नाव नोंदणी करून मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या द्वारे तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना/ मतदारांना अस्तित्वात असलेल्या मतदार यादीमधील तृटींबाबत दि. ९ नोव्हेंबर २०२२ ते दि. ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत निवडणूक शाखा, तहसीलदार वडगाव मावळ यांचेकडे दावे व हरकती नोंदविता येणार आहेत तसेच या कार्यक्रमांतर्गत दि. १ ऑक्टोबर २०२२ या दिनांकापर्यंत १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या,

नवयुवकांना मतदार नाव नोंदणीसाठी (दि. ९ नोव्हेंबर २०२२ नंतर ) आगाऊ अर्ज सदर करता येणार आहेत तरी शहरातील मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास, नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदवावयाचे असल्यास दि. ९ नोव्हेंबर २०२२ ते ८ डिसेंबर. २०२२ या कालावधीमध्ये तहसील कार्यालय, वडगाव मावळ या ठिकाणी आवश्यक अर्ज भरून मतदार यादीतील माहिती अद्ययावत करता येईल. तळेगाव दाभाडे शहराची अस्तित्वात असलेली मतदार यादी talegaondabhademc.org.in

या संकेतस्थळावर” जाहीर सूचना” या ठिकाणी सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

असे आवाहन,  विजयकुमार सरनाईक. मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांनी केले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!