ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड चे उद्योग पळवून घेऊन जाणाऱ्या शिंदे भाजप सरकार ला आप चे खुले आव्हान…

Spread the love

पिंपरी चिंचवड चे उद्योग पळवून घेऊन जाणाऱ्या शिंदे भाजप सरकार ला आप चे खुले आव्हान .

आवाज न्यूज : गुलामअली भालदार , चिंचवड ता ०७ :

महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात पिंपरी चिंचवड परिसरातील उद्योग जाणीवपूर्वक गुजरात ला घेऊन जाण्याचा प्रयत्न राज्यातील शिंदे -भाजप सरकार करत आहेत . याचा जाहिर निषेध म्हणुन दिनांक :06 रोजी संध्याकाळी 5 ते 7 डॉ आंबेडकर चौक भोसरी येथे निषेध आंदोलन करण्यात आलं .

शहरातील बेरोजगारी आणि तरुणाचा रोजगार च्या प्रश्नः पाहता राज्यात आलेले शिंदे भाजप सरकार ने नवीन नवीन प्रकल्प आणुन पिंपरी चिंचवड तरुणांना हाताला रोजगार अपेक्षित आहे , पण राज्यातील विरोधी पक्ष राष्ट्रवादी , कॉग्रेस , शिवसेना असेल की सत्ताधारी भाजप याची भूमिका प्रश्नः निर्माण करणारी आहे. विरोधक त्याची भूमिका सक्षम पणे बजावताना दिसतं नाही .राज्यातील शिंदे – भाजप सरकार महाराष्ट्र राज्यासाठी काम करतंय का ? गुजरात राज्यासाठी काम करत आहे हेंच लोकांना समजत नाहिये .याचा आम आदमी पक्ष जाहीर निषेध करत आहे…

महाराष्ट्र राज्यात येऊ घातलेले 1.5 लाख कोटीचा फॉक्सकोन , 26 हजार कोटींचा टाटा एअर बस हे मोठे मोठे प्रकल्प जे रोजगार निर्मितीसाठी हातभार लावणारे होते या साठी आपल्या शिंदे – भाजप सरकारने सक्षम पणे प्रयत्न केलेले नाही असा आप चा आरोप आहे..

केंद्र सरकार मधील आणि राज्य सरकार मधील भाजप त्याच्या राजकिय शक्तीचा वापर करून महाराष्ट्र राज्यातील येणारे ,होणारे सर्व मोठे उद्योग प्रकल्प गुजरात मध्ये राज्य साठी गुप्तमार्गाने प्रत्यन करत आहेत असा आरोप आप ची भोसरी कार्यकारी अध्यक्ष मंगेश अंबेकर यांनी केला .या आंदोलनात आप चे प्रमुख कार्यकर्ते मंगेश आंबेकर , इम्रान खान , यशवंत कांबळे , सरोज कदम , कुणाल वक्ते , सुरेश भिसे , योगेश , सुरज मिसाळ आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!