ताज्या घडामोडी

तळेगाव-चाकण मार्गावरील खड्ड्यांना लोकप्रतिनिधींची नावे देत महामार्ग कृती समितीकडून निषेधाची खड्डे दिवाळी साजरी..

इंद्रायणीपुलाजवळील,वळणावरील मोठ्या खड्ड्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देण्यात आले.

Spread the love

तळेगाव-चाकण मार्गावरील खड्ड्यांना लोकप्रतिनिधींची नावे देत महामार्ग कृती समितीकडून निषेधाची खड्डे दिवाळी साजरी..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी २४ ऑक्टोबर.

तळेगाव-चाकण महामार्गावर माळवाडी ते इंदोरी दरम्यान ऐन दिवाळीच्या दिवशी सोमवारी (ता.२४) तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीच्या सदस्यांंनी घमेले फावडे हातात घेऊन रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे मातीने बुजवले.

या बुजवलेल्या खड्ड्यांवर दिव्यांची आणि फुलांची रांगोळी काढून शेतकरी हाॅटेल समोरील धोकादायक खड्ड्याला मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव देण्यात आले.तर इंदोरी बाह्यवळण रस्त्यावरील  इंद्रायणीपुलाजवळील,वळणावरील मोठ्या खड्ड्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देण्यात आले.

तसेच घोषवाक्य लिहून राष्ट्रीय महामार्ग आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करण्यात आला.अचानक आणि अभिनव पद्धतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे रस्त्याने ये-जा करणारे प्रवासी आणि वाहनचालक देेखील अचंबित झाले.

तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे,उपाध्यक्ष दिलीप डोळस,सचिव अमित प्रभावळकर, प्रमोद दाभाडे,संजय चव्हाण,चेतन डोळस तसेच जागरुक वाचक कट्टा समूहाच्या सदस्य गणेश बोरुडे, विद्या काशीद,भास्कर माळी, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!