ताज्या घडामोडी

जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर…

29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे.

Spread the love
 आवाज न्यूज : वार्ताहर, तळेगाव दाभाडे, २२ ऑक्टोबर :
सामाजिक : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष. किशोर आवारे यांना महाराष्ट्र साहित्य कला प्रसारीणी सभा पुणे यांच्यावतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृती दिना प्रीत्यर्थ मानाचा, समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारीणी सभा पुणे यांचे विद्यमान अध्यक्ष उध्दव कानडे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. किशोर आवारे यांचे कोरोना काळातील कार्य तसेच कोल्हापूर व चिपळूण पूर परिस्थितीमध्ये  केलेले कार्य, जनसेवा थाळीच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांची केलेली सेवा, ST. कामगारांच्या, संपाच्या काळात, त्यांच्या कुटुंबीयांची, विविध माध्यमांतून केलेली सेवा, समाजासाठी मार्गदर्शक ठरली असून समाजास अत्यंत भूषणावह आहे.
त्यामुळेच आवारे यांना समाज भूषण पुरस्कार देताना मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन अध्यक्ष उद्धव कानडे यांनी केले आहे. शनिवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारीणी सभा पुणे, यांचा पुरस्कार हा पुण्यातील साहित्य वर्तुळात अत्यंत मानाचा मानला जात असल्याने किशोर आवारे यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!