ताज्या घडामोडी
लोणावळा शहर व ग्रामीण भागातील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना साखरेचे वाटप…
लोणावळा भागात दिवसभरात जवळपास 11 टन साखरेचे वाटप..
लोणावळा शहर व ग्रामीण भागातील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना आज साखरेचे वाटप करण्यात आले.
आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी १४ ऑक्टोबर..

लोणावळा शहर व ग्रामीण भागातील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना आज साखरेचे वाटप करण्यात आले. लोणावळा भागात दिवसभरात जवळपास 11 टन साखरेचे वाटप करण्यात आले.

श्री.संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका शुभांगी किरण गायकवाड, सुभाष जाधव, शिवाजी पवार, बाळासाहेब गायकवाड, डाॅ. किरण गायकवाड, शामराव पाळेकर, विलास बडेकर यांच्या हस्ते सभासदांना साखर वाटप करण्यात आली.

यावेळी मंजुश्री वाघ, प्रमोद गायकवाड, जितेंद्र कल्याणजी, संजय आडसुळे, बाबुभाई शेख, नासिर शेख, राजु बोराटी, रवी सलोजा, भालचंद्र खराडे, दीपक गायकवाड, संजय थोरवे, भरत तिखे, सनी पाळेकर, उल्हास पाळेकर आदी उपस्थित होते.



