आम आदमी पार्टीमध्ये जाधववाडी भागातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा प्रवेश..
जाधववाडी प्रभागातील कार्यकर्त्या सिता केंद्रे यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटक विजय कुंभार यांच्या हस्ते अनेक महिला व पुरूष कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश..
- आम आदमी पार्टीमध्ये जाधववाडी भागातील मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचा प्रवेश..
आवाज न्यूज : गुलामअली भालदार, चिंचवड १४ ऑक्टोबर..

आम आदमी पार्टीच्या जाधववाडी प्रभागातील कार्यकर्त्या सिता केंद्रे यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटक विजय कुंभार यांच्या हस्ते अनेक महिला व पुरूष कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करण्यात आला.

या मध्ये तुकाराम इंगोले, अंकुश कवटकर, साईनाथ इंगोले, गजानन इंगोले, गुलाब हंबर्डे ,शिवराज इंगोले, वैभव इंगोले, विठ्ठल सावंत, ओम डांगे, विष्णू काळे, प्रभाकर इंगोले ,विष्णू घोरबांड, पांडुरंग कवटकर ,वैभव कौशल्य, राज कांगणे, सुरेखा कांगणे कौशल्या कळसाईत, मिरा शिखरे, संजय कडोळकर, गोरख पिंपळे, छाया वावरे
मेघा गरिबे, मथुरा देशमुख, हौसाबाई कोपनर, सुलोचना उबाळे,मंदा गोरे,शालन पवार, आदी महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी प्रवेश केले.

प्रवेशानंतर काही कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. त्यावेळी त्यांनी म्हटले देशामध्ये प्रचंड महागाई वाढली आहे पेट्रोल डिझेल गॅस सीएनजी खाद्यतेल महाग झाले आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली आणि पंजाब या ठिकाणी जनतेला चांगल्या सुविधा दिल्या आहेत वीज शिक्षण पाणी शाळा यावरती मोठा भर दिला आहे त्यामुळे आम्ही आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाठ, आप प्रवक्ते प्रकाश हगवणे, आप युवा नेते डॉक्टर अमर डोंगरे, राहुल धोत्रे सुनील शिवशरण, कमलेश रणवरे, माया सांगवे, ब्रह्मानंद जाधव, सुरेश भिसे, आजिनाथ सकट, सुरेश बावनकर,आपचे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



