ताज्या घडामोडी

देवलेतील श्री काळभैरवनाथ मंदिरात नऊदिवस प्रवचनांचे कार्यक्रम …

नऊ दिवस घटस्थापनेनिमित्त देवाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवलेला होता..

Spread the love

देवलेतील श्री काळभैरवनाथ मंदिरात नऊदिवस प्रवचनांचे कार्यक्रम …

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.६ प्रतिनिधी.

देवलेतील श्री काळभैरवनाथ मंदिरात नऊ दिवस प्रवचनांचे व भजनाचे कार्यक्रम संपन्न झाले.श्री काळभैरवनाथ, आणि जोगेश्वरी यांच्या नऊ दिवस घटस्थापनेनिमित्त देवाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवलेला होता.. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

पहिल्या दिवशी मान्यवरांचे हस्ते घटस्थापना झाली.. पहिल्या माळेला ह.भ.प.दिलीप महाराज खेंगरे यांचे प्रवचन झाले.दुसऱ्या माळेला ह.भ.प. घनश्याम महाराज पडवळ यांचे प्रवचन झाले. तिसऱ्या माळेला ह.भ.प. बाबाजी महाराज काटकर यांचे प्रवचन झाले. चवथ्या माळेला ह.भ.प. अनंता महाराज शिंदे यांचे प्रवचन झाले. पाचव्या माळेला ह.भ.प.गणेशमहाराज गोणते यांचे प्रवचन झाले.

सहाव्या माळेला ह.भ.प.कृष्णा महाराज जांभूळकर यांचे प्रवचन झाले. सातव्या माळेला ह.भ.प.गोपीचंद महाराज कचरे यांचे प्रवचन झाले. आठव्या माळेला ह.भ.प. नाथामहाराज मोरे यांचे प्रवचन झाले; तर नवव्या माळेला ह.भ.प. तुषार महाराज दळवी यांचे प्रवचन झाले. ग्रामस्थांनी ता. ४ रोजी १२ ते ४ या वेळेत भंडारा आन्नप्रसादाचा लाभ घेतला.

देवले ग्रामस्थ यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. कुसगाव बुद्रुक येथील श्री. काळभैरवनाथ देवाच्या मंदिरात नवराञोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आल्यावर येथे नऊ दिवस भजनाचे कार्यक्रम संपन्न झाले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!