ताज्या घडामोडी

विश्व हिंदु परीषद,बजरंग दल, तळेगाव दाभाडे शहर.ॐ नवचंडि याग, संपन्न..

Spread the love

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, ३ ऑक्टोबर.

 विश्व हिंदु परीषद,बजरंग दल, तळेगाव दाभाडे शहर.ॐ नवचंडि याग रविवारी दिनांक ०२/१०/२०२२ श्री दुर्गामाता मंदिर,भोई आळी,तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला.

दुर्गा माता मंदिर मध्ये रेडे काका व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सकाळी दहा वाजता नवचंडी  यागास सुरुवात केली, यागास पाच जोड्या बसल्या होत्या, अनुपमा किशोर परदेशी यांना यागाचा मान देण्यात आला होता. त्यांच्या समवेत वर्षा गोपाळ परदेशी, कांचन प्रेमनाथ परदेशी, वैशाली चंद्रकांत परदेशी, माया सुनील परदेशी हे जोडीमध्ये सहभागी झाले होते.

तसेच दिनांक ३/१०२२ रोजी दुर्गा माता रोडची दौंड ची सांगता करण्यात आले यावेळी दुर्गा माता दौडचे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

दुर्गामाता दौडमध्ये जय श्रीरामच्या जपाने जयघोष करण्यात आला.

केशरी ध्वज घेऊन दौड पुढे चालणाऱ्या कन्येचे  सिद्धी परदेशी व रुचिका  खळदे यांनी हार घालून स्वागत केले.

दुर्गा माता मंदिर मध्ये दौंडच्या कार्यकर्त्यांकडून देवीला हार घालून पूजा करुन, देवीची आरती करण्यात आली. आरती संपन्न झाल्यानंतर, जय श्रीराम च्या घोषणा देत तसेच दुर्गा माताची घोषणा  दिल्या व दुर्गा माता दौडचे प्रातिनिधिक   स्वरूपात  दुर्गा माता मंदिराचे ट्रस्टींकडून श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व अल्पोपहार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी संतोष परदेशी ,प्रेमनाथ परदेशी, सुजित परदेशी, नंदलाल परदेशी, राजेंद्र अस्वले, गणेश माडेंकर , राजू परदेशी, यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!