ताज्या घडामोडी

कन्हेरसर यमाई मातेची अष्टमीची आजची पूजा संपन्न..

संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

Spread the love

आज दुर्गाष्टमी कनेरसर यमाई मातेची अष्टमीची आजची पूजाविधी संपन्न..

आवाज न्यूज: राजगुरुनगर, कन्हेरसर ३ ऑक्टोबर.

यमाई देवीची आजपहाटे पुजा संपन्न झाली. नवरात्रोत्सवात रोज  हजारो भाविकांनी ,( माता-भगिनींनी) आईचे दर्शन व पूजा केली. संबळ व नगाऱ्याच्या जय  घोषात आरती संपन्न होत आहे. व आठ दिवसात  महाप्रसादाची रोज व्यवस्था करण्यात आली होती. रोजच्या साडीचोळीच्या शृंगारात आई साहेबांचे वेगळेच रूप पाहण्यात आले व त्याचा लाभ हजारो भावी भक्तांनी घेतला.

नवरात्र उत्सवामध्ये मंदिर परिसरामध्ये, भरपूर दुकाने हार फुलांची , साडी ,खण ,हळदी कुंकू, बांगड्याची दुकाने  थाटली आहेत.

दिवसभर देवीचे गोंधळी, यांच्या संबळच्या तालावर होणारा नादामुळे वातावरण उत्साही झाले. आईच्या मंदिरामध्ये जोगवेकरी  उपस्थित असल्याने महिलांनी जोगवा देण्यासाठी गर्दी केलेली पहायला मिळाली.आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने रात्री मंदिर परिसर लख्ख प्रकाशमय झाले.

येथील मंदिरामध्ये पोलीस महिला पोलीस व ट्रॅफिक साठी नियंत्रण करण्यासाठी, आरटीओ पोलीस देखील उपलब्ध होते , सेवेकऱ्यांच्या मार्फत मंदिर परिसर रोजच्या रोज स्वच्छ करण्यात येत आहे.

मंदिरामध्ये रोज भजन व कीर्तनाची सेवा घडत असल्याने येथील परिसरात भक्तीमय वातावरण झाले आहे.. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!