ताज्या घडामोडी

आर. पी .आय (आठवले गट ) मावळ तालुका यांच्या वतीने स्थानिक बेरोजगार तरूणांना रोजगार मिळण्यासाठी तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा..

आर.पी.आय चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली व मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला.

Spread the love

आर. पी .आय (आठवले गट ) मावळ तालुका यांच्या वतीने स्थानिक बेरोजगार तरूणांना रोजगार मिळण्यासाठी तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर,  लोणावळा  ता.२९(प्रतिनिधी)

आर. पी .आय (आठवले गट ) मावळ तालुका यांच्या वतीने स्थानिक बेरोजगार , भूमिपुञ यांना रोजगार मिळण्यासाठी तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा आज काढण्यात आला व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

आर.पी.आय चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली व मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला.
मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळण्यासाठी पक्षाच्या वतीने जाहीर मोर्चा आज ता.29 रोजी दुपारी 12 वा. वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयावर काढण्यात आला.

या मोर्चामध्ये पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण , तरुणी सहभागी झाले. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देताना औद्योगिक वसाहतिमधील कंपन्यांचे प्रतिनिधी व आर. पी. आय. पक्षाचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पुढील पंधरा दिवसात लावणे व भूमिपुत्रांना 50% नोकऱ्या देणे ह्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या, अन्यथा बैठक न झाल्यास पक्षाच्या वतीने कंपन्यांच्या दारात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावळ तालुका यांच्या वतीने देण्यात आला.

या मोर्चात रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नेते सूर्यकांतजी वाघमारे, तालुकाध्यक्ष. लक्ष्मण भालेराव, पुणेजिल्हा युवक आघाडीचे समीर जाधव, महाराष्ट्र प्रदेश महिलाध्यक्षा सौ.यमुनाताई साळवे , गणेश गायकवाड, अतुल सोनवणे, मालनताई बनसोडे, संतोष कदम, अंकुश सोनवणे,
भावनाताई ओव्हाळ, किसन आहिरे, अनिल भांगरे,

अशोक सरवते, नितीन ओव्हाळ, सुनील गायकवाड, कमालशील म्हस्के, सिद्दार्थ चौरे, बाळासाहेब जाधव, दादासाहेब वाघमारे,
रोहिणी देसाई, सागर देसाई, रुपेश गायकवाड, सिद्दार्थ भालेराव, प्रफुल्ल भालेसेन, नागेश ओव्हाळ, सुनील भालेराव, गौतम गायकवाड, सुमित ननावरे, खंडू वाघमारे, विकास शिंदे ,अरविंद रोकडे, शरद सोनवणे, निलेश यादव, अभिजित सोनवणे, राजू देसाई, प्रदीप बनसोडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!