ताज्या घडामोडी

मावळात औंढे , औंढोली सह अनेक गावात दोन वर्षानंतर विनामास्क फिरत बैलपोळा सण उत्साहात साजरा..

लंपी संसर्ग रोगाच्या कारणांमुळे मावळात साधेपणाने बैलपोळा साजरा करण्यचे आदेश असल्याने शेतकऱ्यांनी एकदम बैल मिरवणूकीसाठी न आणता ;टप्प्याटप्प्याने मिरवणूकीसाठी आणल्याने परिसरात खिलारी बैल , बैलगाडा शर्यतीचे बैल यांना चांगल्या प्रकारे सांभाळणारे शेतकऱ्यांनी बैल धष्ठपुष्ठ केलेले पहायला मिळाले.

Spread the love

मावळात औंढे , औंढोली सह अनेक गावात दोन वर्षानंतर विनामास्क फिरत बैलपोळा सण उत्साहात साजरा..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.२६ (प्रतिनिधी )

मावळात औंढे , औंढोली सह अनेक गावात दोन वर्षानंतर विनामास्क फिरत बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. लंपी संसर्ग रोगाच्या कारणांमुळे मावळात साधेपणाने बैलपोळा साजरा करण्यचे आदेश असल्याने शेतकऱ्यांनी एकदम बैल मिरवणूकीसाठी न आणता ;टप्प्याटप्प्याने मिरवणूकीसाठी आणल्याने परिसरात खिलारी बैल , बैलगाडा शर्यतीचे बैल यांना चांगल्या प्रकारे सांभाळणारे शेतकऱ्यांनी बैल धष्ठपुष्ठ केलेले पहायला मिळाले.

औंढोली , औंढेखुर्द येथे ग्रामदैवत असलेल्या श्री हनुमान मंदिराला तसेच शिव मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी बैलांची ढोल ताशा , बँजोचे तालामधे मिरवणूक काढण्यात आली होती.
पहाटे पहाटे बैलांना चारायला नेऊन व सकाळी गाव तळ्यात आंघोळ घालून घराजवळ आणले.त्याबना शिंगे रंगवून , अंगावर रंग लावून , भंडारा व गुलाल टाकून बैलाचे शिंगाला बेगड लावून , गळ्यात घुंगूरपट ,फुलांच्या माळा घालून तसेच कपाळास शेंदगुरी , बाशींग बांधून त्यांची पुजा करण्यात आली.त्यांना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. दुपारी उन्हे उतरल्याबरोबर चारच्या पुढे बैलांची ढोलताशांचा गजरामधे मिरवणूक काढण्यात आली. ..
..प्रत्येक गावात बैलगाडीने शेती नांगरणे कामाला जास्त बैलाचा वापर केला जात नसल्याने व ट्रॕक्टर चा वापर वाढल्यामुळे बैलांची संख्या निम्यापेक्षा जास्त घटली आहे. तरीही काही हौशी बैलगाडा शर्यती मधे सहभागी होणारे प्रसिध्द गाडामालक या खेळामुळे , बैलांची पोटच्या मुलासारखी जोपासणा करत आसल्याने आजही खिल्लारी बैलांची जोडी औंढेखुर्द , औंढोली गावात पहायाला मिळत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!