ताज्या घडामोडी

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये अभियंता दिन साजरा…

Spread the love

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये अभियंता दिन साजरा

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, २०, सप्टेंबर..

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित नूतन अभियांत्रिकी मध्ये अभियंता दिन साजरा झाला. सर श्री विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आनंद महले ग्रुप चे प्रकल्प प्रमुख अभय भेंडे आणि सहाय्यक व्यवस्थापक समीर देशमुख तसेच नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, सर्व विभागप्रमुख डॉ.नितीन धवस, डॉ.विनोद किंबहुने, डॉ.शेखर राहणे, डॉ.नितीन शेरजे, डॉ. सागर जोशी प्रबंधक विजय शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

अभियंता दिनाचे औचित्य साधत विविध विषयांमध्ये शंभर टक्के निकाल लागलेल्या विषय शिक्षकांचा तसेच महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात चांगले कार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थी हा केंद्रस्थायी ठेऊन शिक्षक हा नेहमी विद्यार्थी घडवत असतो, विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती आणि गुणप्राप्ती दोन्ही मिळवून देत असतो. विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्याची भविष्य निर्मिती करत असल्यामुळे शिक्षण हा सर्वात महत्वाचा घटक असून सर्व शिक्षक हे मोलाचे काम करत आहे,” असे भेंडे यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुषमा भोसले आणि कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. नितीन धवस यांनी व्यक्त केले. डॉ. सागर जोशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!