ताज्या घडामोडी

सहायक अभियंत्यास केली बेदम मारहाण ।।

वीजजोडणी खंडित केल्याचा राग धरुन केली मारहाण  ।।

Spread the love

 

सहायक अभियंत्यास केली बेदम मारहाण ।।        वीजजोडणी खंडित केल्याचा राग धरुन केली मारहाण  ।।

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे २० सप्टेंबर ।।।

वीजजोडणी खंडित केल्याच्या रागातून तरुणाने महावितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यास मारहाण केली. तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि. १९) दुपारी पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विक्रम गुलाब राठोड (वय ३९, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ओंकार ऊर्फ विकी नवघने (२५, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रम राठोड हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तळेगाव दाभाडे स्टेशन शाखा- १ येथे सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. आरोपीकडे महावितरण कंपनीचे वीजमीटर आहे. त्याचे वीजबिल भरले नाही.

आरोपीने बिल भरले नाही. त्यामुळे आरोपीची वीज जोडणी खंडित करण्यात आली. याचा राग मनात धरून आरोपी फिर्यादीच्या कार्यालयात आला. हे चुकीचे केले आहे, असे आरोपी फिर्यादीला म्हणाला. तसेच त्याने फिर्यादीला मारहाण केली. तू एफआयआर तर कर, मी नंतर येऊन तुला ठेचतो, अशी धमकी आरोपीने फिर्यादीला दिली.

चुकीचे आले होते. त्यामध्ये दुरुस्त करून बिल बरोबर करून दिले होते वीज बिलाबाबत आरोपी  महिन्याभरापूर्वी फिर्यादी यांच्या कार्यालयात आला होता.

त्यावेळी त्याने शिवीगाळ केली होती. त्यानंत चुकीचे वीजबिल दुरुस्त करून देऊन बिलाची रक्कम भरण्याबाबत आरोपीला सांगण्यात आले. त्याबाब त्याला एसएमएस केला होता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!