ताज्या घडामोडी

फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? मनसे अध्यक्ष. राज ठाकरे ..

राज ठाकरे आक्रमक .. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प आहे ।।

Spread the love

 

फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? राज ठाकरे आक्रमक

आवाज न्यूज: मुंबई (कर्जत) प्रतिनिधी १४ सप्टेंबर.

फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?

हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं.

मनसे अध्यक्ष, राज ठाकरे..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!