ताज्या घडामोडी

सुसंगतीची गंगोत्री– यशस्वीतेची परिणीती !

देवाकडे प्रार्थना करून आपण गोष्टींची मागणी करीत असतो, पण जीवनामध्ये प्रार्थने बरोबरच "पुरुषार्थ आणि नैतिकता" या दोन्ही बाबीं यशप्राप्तीसाठी आवश्यक असतात .

Spread the love
सुसंगतीची गंगोत्री– यशस्वीतेची परिणीती !  देवाकडे प्रार्थना करून आपण गोष्टींची मागणी करीत असतो, पण जीवनामध्ये प्रार्थने बरोबरच “पुरुषार्थ आणि नैतिकता” या दोन्ही बाबीं यशप्राप्तीसाठी आवश्यक असतात .

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, ११ सप्टेंबर.

अर्थात प्रार्थना न करूनही चालणार नाही  “कारण प्रार्थना केली नाही तर आपल्या मनात सात्विक विचारांचा उगम होणार नाही”  प्रार्थना केल्याने सुबुद्धी, सुमती, शांती ही नैतिक मूल्य आपोआप आपल्याला प्राप्त होतात.
आणखी एक दुसरी महत्त्वाची बाब ही आहे की, प्रत्येक व्यक्तीला स्वतःची लढाई ही स्वतः लढावी लागते ईश्वर काही तुमच्यासाठी लढू शकत नाही*, पण हे तितकच खर आहे की प्रार्थना केल्याने ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी प्रदान करू शकतो.

जो लाभ सत्संगाने होतो तो जगातील कुठल्याही सौंदर्यामुळे, संपत्तीमुळे, सत्तेमुळे, अधिकारामुळे प्राप्त होऊ शकत नाही कारण सत्संगामध्ये आयुष्याकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन तुम्हाला प्राप्त होतो. मित्रांनो जर आपल्याला स्वतःचं जीवन सुखी, समृद्ध, समाधानी करायचं असेल तर तुमच्या मनावर उत्तम संस्काराच बीजारोपण करावच लागेल.

जेणेकरून तुमच्यातील दोष आणि वाईट सवयी ह्या आपोआप नाहीश्या होतील आणि त्याच आपल्या हातून सत्कर्म घडेल .
या तुमच्या कृतीच अनुकरण पुढील पिढी निश्चितच करणार आहे म्हणून *मनुष्यावर जे संस्कार होतात ते त्याच्या कर्माच बीज ठरवतात आणि हे उत्तम संस्कार सत्संगतूनच आपल्याला प्राप्त होतात.
अर्थात संगत कशी ठेवायची, कोणाशी ठेवायची याचे स्वतः निर्णय घेणारे सार्वभौम निर्माते तुम्हीच आहात तेवढी सद्सद्विवेकबुद्धी परमेश्वराने आपल्याला जन्मताच प्रदान केलेली आहे, म्हणूनच संतांनी म्हटले आहे की,
“सुसंगती सदा घडो”
सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो
विषय सर्वथा नावडो* ” हीच किमान अपेक्षा ठेवून मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद.

 लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!