प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅक्टर उपलब्ध नसल्याने, कामशेतमध्ये नवजात बाळ दगावले..
कुठलीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहणाऱ्या निवासी डॉक्टर किरण जाधव या कर्तव्यात कसूर करत असल्याने यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. .
प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅक्टर उपलब्ध नसल्याने, कामशेतमध्ये नवजात बाळ दगावले.
आवाज न्यूज: शिवानंद कांबळे, कामशेत प्रतिनिधी,८ सप्टेंबर. 
उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅक्टर उपलब्ध नव्हते
कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात शहरातील गावठाण परिसरात राहणाऱ्या एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर मंगळवारी (दि.६) रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु यावेळी निवासी डॉक्टर उपलब्ध न झाल्याने प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या बालकाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे कुठलीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहणाऱ्या निवासी डॉक्टर किरण जाधव या कर्तव्यात कसूर करत असल्याने यांच्यावर सदस मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.
आरोग्य केंद्रातील निवासी डॉक्टर किरण जाधव या प्राथमिक आरोग्य केंद्रातच राहायला आहे. या कोणतीही पूर्व सूचना न देता गैरहजर होत्या. त्यामुळे पेशंटला वेळेत उपचार मिळाले नाही. मागील एक आठवड्यापासून गैरहजर असून विशेष बाब म्हणजे याची कुठेही दप्तरी नोंद नाही.
सरकारी दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध न झाल्याने प्रसूती वेदना येणाऱ्या महिलेला कामशेत शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कामशेत गावचा प्रथम नागरिक सरपंच या नात्याने घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाशी शिवानंद कांबळे व ग्रामपंचायत माजी उपसरपंच नीलेश दाभाडे व अभिजीत शिंनगारे सर्वतोपरी चर्चा करुण उचित स्तरावर कारवाई करण्याचे वरिष्ठ स्तरावरून आदेश देण्यात आले असून कारवाई करण्यात येईल, दोषींना पाठीशी घालणार नाही असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी(सी.ओ) मा.आयुष प्रसाद साहेब यांनी दिलेले आहे,तसेच पुणे जिल्हा परिषद पुणे मुख्य आरोग्य अधिकारी मा.भगवान पवार साहेब यांना चौकशी कमिटी स्थापन करण्याचे आदेश दिले,त्यांच्याशी मी स्वता फोनद्वारे चर्चा करुण उद्या घटनास्थळी येऊन उचित करवाई करण्याचे आश्वासन दिले,कारवाई होणार परंतु कोणत्याही राजकीय वलय न देता एकत्रित रित्या घडलेल्या समस्या बाबत पाठपुरावा करू. सरपंच :- रुपेश अरुण गायकवाड
डॉ. चंद्रकांत लोहारे (तालुका आरोग्य अधिकारी) : निवासी डॉक्टर उपलब्ध न झाल्याने कामशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेला वेळेत उपचार मिळाले नाही. याप्रकरणी चौकशी करून वरिष्ठांकडे संबंधित डॉक्टरांवर कारवाईसाठी अहवाल पाठवणार आहे.



