ताज्या घडामोडी

धैर्य__ यशस्वितेची गुरुकिल्ली.. डॉक्टर शाळीग्राम भंडारी..

धाडस ही एक मानसिक स्थिती आहे . ती ज्यावेळी प्रगटते त्यावेळी ती अनेक परिवर्तन घडवून आणते

Spread the love

धैर्य__ यशस्वितेची गुरुकिल्ली

धाडस ही एक मानसिक स्थिती आहे . ती ज्यावेळी प्रगटते त्यावेळी ती अनेक परिवर्तन घडवून आणते .

 आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे ४ सप्टेंबर..

त्यामुळे आपल्या हातून अनपेक्षितपणे एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट घडते.
धाडस याची निर्मिती मनाच्या गाभाऱ्यातून होते सर्वप्रथम मन परिस्थितीचा आढावा घेतं हळूहळू आत्मविश्वासाकडे वळतं आणि कृती करण्यास प्रवृत्त होतं.
रस्त्यावरून जाताना आपण अनेक अपघात बघतो आपल्या ओळखीचा ,जाती-पातीचा, धर्माचा असा कोणीही नसलेला पण रक्ताच्या थारोळ्यात बघितल्यानंतर त्याला मदत करावी ,जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवावं असं मनात खूप येत .
पाहणाऱ्याच्या ,प्रत्येकाच्या मनात हा विचार चमकून जातो पण प्रत्यक्ष कृती मात्र होत नाही. असं का?….
हजारातून एखादा येतो आजाराचा विचार न करता त्याला आपल्या हातात उचलतो आणि मिळेल त्या वाहनाने जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो.
महत्त्वाचं म्हणजे पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे .तरी पण तो हे सर्व मनापासून स्वीकारतो आणि इथेच त्याच्या वेगळेपणाचा धाडसाचं दर्शन होतं.
सातशे वर्षापूर्वी कबीरांनी म्हटलं होतं –
” जिन हुंडा तीन पाया
गहरे पानी पैठ,
में बबुरा बुढ़न उरा,
रहा किनारे बैठ”.

म्हणजे ,मोती हा समुद्राच्या खोल तळाशी सापडणाऱ्या एखाद्या शिंपल्यात बंदिस्त असतो हे अनेकांना माहीत आहे ,पण तो मोती मिळवण्याचे धाडस , प्रयत्न कोण करतं ?
आमच्यासारखे हजारो लोक समुद्राच्या किनार्‍यापर्यंत जातात काही पाण्यात उडी मारतात आणि काही समुद्रात डुबकी मारून तळाशी असणारा मोती हस्तगत करतात.
यात इथेही आपल्याला समुद्राच्या तळाशी असणाऱ्याचा शोध घेणाऱ्या व्यक्तीच्या धाडसाचे दर्शन घडतं .

( To be or not to be) करू का नको ,करू का नको या द्विधा अवस्थेमध्ये असणाऱ्यांची संख्या खूप आहे .

त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर एखाद्याच्या हातून ज्यावेळी धाडसाने ही काही कृती घडते तोच कौतुकास पात्र होतो.
मला आठवत आहे महाविद्यालयात अनेक प्रेम प्रकरण असतात आमच्या (B. J. Medical) महाविद्यालयात असेच उत्तम व्यक्तिमत्त्व लाभलेल्या एका मुलीवर आमचे चार मित्र एकाच वेळी प्रेम करत होतेे .त्यापैकी एकाने तिला लग्नाचं विचारलं ,तिने होकार दिला आणि त्यांचा संसार सुरू झाला आजही सुरु आहे .
वीस वर्षानंतर त्यांना जेव्हा परत भेटलो तेव्हा सहज जिज्ञासेने मी त्यांची मुलाखत घेतली ,तर त्या मुलीने प्रामाणिकपणे कबूल केले की यांनी मला लग्नाचं विचारण्याचं धाडस केलं नसतं तर कदाचित मला आजचा हा दिवस ,सुखाचा संसार पाहण्याचे भाग्य लाभलं नसतं . आपल्या आयुष्यात अशा घटना आहेत की, ज्या ठिकाणी ,पदोपदी धाडसी होण्याची आवश्यकता ,आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

समुद्रावर पोहायला जाणाऱ्यांच्या जीवनात अपघात घडतात.
त्याच वेळी तर समुद्रात पोहणाऱ्याला समुद्र आत खेचून घेतो या समोर बुडणार्यांपैकी जिवाच्या आकांताने ओरडणारे अभागी व्यक्ती आपण पाहतो .त्या बघणाऱ्या व्यक्तीत एखाद्या धाडसी प्रवृत्तीचा माणूस प्रगट होतो आणि तो दोन चार बुडणाऱ्या व्यक्तींचे लाख मोलाचे प्राण वाचवण्यास कारणीभूत ठरतो . त्यावेळी जर त्या व्यक्तीने धाडस दाखवले नसते तर… लाख मोलाचे ते जीव वाचले नसते.

शिक्षण घेताना ,व्यवसाय करताना ,आपली बाजू मांडताना, अन्यायाविरुद्ध चवताळुन उठताना ,या धाडसी प्रवृत्तीची अत्यंत आवश्यकता असते.

शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात तर धाडस ओतप्रोत भरलेले आहे.
शिवचरित्र वाचल्यानंतर त्यातील ठळक तीन प्रसंग, एक म्हणजे पन्हाळा जवळ सिद्धीचा असलेला वेढा आणि त्यातून सुटण्यासाठी बाजीप्रभूने लढवलेली पावनखिंड,
दोन म्हणजे प्रतापगडावरील अफजलखानाचा वध आणि औरंगजेबाच्या मगर भेटीतून आग्र्याहून त्यांनी केलेली स्वतःची सुटका ही खरोखरच इतिहासातील प्रत्येकाला प्रेरणा देणारी धाडसी वृत्तीची उदाहरणे आपण विसरू शकणार नाही.
यशस्वी उद्योजक यांच्या आयुष्याचा प्रवास जर आपण जवळून पाहिला तर त्यांनी धाडसाने घेतलेले निर्णयामुळे वेगवेगळे प्रकल्प ते वेळोवेळी यशस्वी होऊ शकले आणि म्हणूनच आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर पोहोचले.

त्यात प्रामुख्याने किर्लोस्कर, बजाज ,अंबानी, मिठाईवाले चितळे अशी अनेक परिचित नावं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतील .
बऱ्याच वेळा अनाठायी धाडस हे अंगलट येण्याची शक्यता शक्यताही असते म्हणून कुठलाही वेळ न घालवता परिस्थितीचा त्वरित अंदाज घेऊन धाडसाने निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करणे हे आवश्यक आहे ,त्याशिवाय आपण आपलं इप्सित ध्येय गाठू शकत नाही.

धाडसी प्रवृत्ती अंगी बाळगण्यासाठी यशस्वी पुरुषांची चरित्रे वाचणे आवश्यक आहे .
मग ती राष्ट्रीय ,राजकीय, सामाजिक ,औद्योगिक
पातळीवरती असो ती आपल्याला निश्चितच आपल्या आयुष्याच्या वाटचालीत प्रेरणादायी ठरतात.
हाती घेतलेले कोणतेही काम पूर्ण करण्याची प्रत्येकाची मनापासून इच्छा असते ,क्षमताही असते पण ….थोडासा धाडसाचा अभाव झाला की ते कार्य, तो प्रकल्प अर्धवट राहतो म्हणूनच सारखी खंत बोचत असते अरेरे….
मी जरी थोडं साहस दाखवलं असतं तर त्याच्या ठिकाणी त्याच्याजागी मी असतो ही रुखरुख आपल्या मनाला खूप यातना देत असते ,म्हणून आपण जे क्षेत्र निवडू त्या या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींच्या जीवनात त्यांनी केलेल्या संकटावर मात ,त्याचं निरीक्षण करणं व त्यातून शिकवण घेऊन वाटचाल करणं हेे हातचं आहे.

यश हे कस्तुरीमृगासारखं असतं .कस्तुरीमृग हवा असेल तर हरणाच्या वेगाने आपल्याला धावावं लागेल .कस्तुरीमृग सहजासहजी आपल्या हातात येत नाही. त्यासाठी धावण्याचं धाडस करण हे अटळ आहे. हे ज्याला जमलं तो आपल्या जीवनात निश्चितपणे यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात ओळखला जाईल.

ये माना कि जहा को गुलशन बना सके नही हम ,
काटे तो कुछ कम किये गुजरे जहा से हम “.

आपल्या हातून रस्त्यावरती बोचणाऱ्या जखमा करणाऱ्या काट्यांना दूर करण्याचे सामर्थ्य आपल्या धाडसी वृत्तीने आपल्याला प्राप्त होवो हीच शुभेच्छा !
आपल्या सर्वांपर्यंत आजचा विषय पोहोचला असेल म्हणून मी येथेच थांबतो .  विशेष लेखन :                                       लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!