ताज्या घडामोडी
रिक्षा चालक सामाजिक कार्यकर्ते निलेश पारगे यांचा प्रामाणिकपणा..
वडगांव मावळ येथील महिला शीतल मोरे यांची पर्स चाकण रस्त्यावर पडलेली, त्यांना परत दिली .
आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी.२ सप्टेंबर.
वडगांव मावळ येथील महिला शीतल मोरे यांची पर्स चाकण रस्त्यावर पडलेली असताना रिक्षा चालक सामाजिक कार्यकर्ते निलेश पारगे यांना आढळून आली..
पर्समध्ये सहा हजारावर रोख रक्कम आणि महत्वाची अत्यावश्यक कागदपत्रे आढळून आली.त्यावर असलेल्या मो क्रमांकावर संपर्क साधून निलेश यांनी संबंधित महिलेचे भाऊ यांना बोलावून घेतले.माजी नगरसेवक सुनील कारंडे यांच्या हस्ते संबंधित पर्स त्यांना सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी आदर्श रिक्षा चालक पदाधिकारी आणि नागरिकांनी निलेश पारगे याचे कौतुक केले..माणसातील माणुसकी जिवंत ठेवण्याचे कार्य निलेश यांच्यासारखे प्रामाणिक रिक्षा चालक करत आहेत याचा अभिमान असल्याचं सुनील कारंडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.



