मावळ तालूक्यातुन किल्ले रायगडावर थेट जाण्याकरीता बस (ST) सुरु करा..
गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगाव मावळ यांचे कडुन मा.आगार व्यवस्थापक, तळेगाव दाभाडे आगार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना निवेदन..
तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड नियमीत अशी एसटी बस सेवा चालू करा.
आवाज न्यूज: 26 ऑगष्ट..मावळ तालुक्यातुन असंख्य शिवभक्त किल्ले रायगडाची वारी करतात, तर काही जण सह कुटुंब रायगडी दर्शना करीता जातात.
मावळ तालूक्यातुन किल्ले रायगडावर थेट (Direct) जाण्याकरीता अशी कोणती ही वाहतूकीची सोय उपलब्ध नाही. यामुळे जे शिवभक्त सह कुटुंब, वैयक्तिक व सामूहिक रित्या जावू इच्छितात त्यांना अडचण होते.
सर्वांच्या वतीने गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगाव मावळ यांचे कडुन मा.आगार व्यवस्थापक, तळेगाव दाभाडे आगार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना किल्ले रायगड करीता तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड अशी नियमित एसटी बस सेवा चालू करणेबाबत आज पत्र देण्यात आले.
सदर एसटी बस ही, तळेगाव दाभाडे – लोणावळा – पाली – किल्ले रायगड. (परतीचा मार्ग तसाच) किंवा तळेगाव दाभाडे – मुळशी – ताम्हिणी घाट – किल्ले रायगड. (परतीचा मार्ग तसाच) या मार्गे दररोज ,तळेगावातुन सकाळी ०६:०० वा. सुटुन रायगड पायथा येथे ०९:३० वा. पोहचेल तसेच परतीच्या वेळी ती संध्याकाळी ०६:०० वा. सुटुुन अंदाजे ०९:०० वा. पोहचेल या प्रमाणे चालू करण्याबाबत सुचवले आहे. यामुळे एका दिवसात किल्ले रायगडाचे व्यवस्थित रित्या दर्शन होवू शकेल.
सदर गाडी ही पाली मार्ग गेल्यास गणेश भक्त यांना पाली येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शन ही करता येइल तसेच किल्ले सरसगड, किल्ले सुधागड या ठिकाणीही भेट देता येईल. तसेच मार्गात येणाऱ्या गावांनाही फायदा होईल.



