ताज्या घडामोडी

इनर व्हील क्लब तळेगांव दाभाडे अंतर्गत संपर्क प्रकल्प भांबर्डे येथे अन्नधान्य वाटप..

भांबर्डे प्रकल्पामध्ये इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे येथील अध्यक्षा - वैशाली दाभाडे , सेक्रेटरी - निशा पवार तसेच इनरव्हील चे इतर सदस्य यांच्या वतीने अन्नधान्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

Spread the love

इनर व्हील क्लब तळेगांव दाभाडे अंतर्गत संपर्क प्रकल्प भांबर्डे येथे अन्नधान्य वाटप” ..

आवाज न्यूज:  देवरेसर, मावळ प्रतिनिधी 24 ऑगष्ट 

सोमवार दिनांक 23 /8 /2022 रोजी संपर्क भांबर्डे प्रकल्पामध्ये इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे येथील अध्यक्षा – वैशाली दाभाडे , सेक्रेटरी – निशा पवार तसेच इनरव्हील चे इतर सदस्य यांच्या वतीने अन्नधान्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक  वाळून सर यांनी केले. इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या प्रेसिडेंट वैशालीताई दाभाडे  , निशा पवार  सेक्रेटरी, ममता मराठे , भाग्यश्री काळेबाग , मंगल पवार , सुजाता खंडागळे , या सर्वांचे स्वागत व सत्कार श्रीफळ देऊन नवनिता चटर्जी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी वैशालीताई दाभाडे यांनी मुलांना दिव्याचे महत्त्व तसेच अभ्यासाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन चांगले गुण मिळवण्यासाठी इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना व 80% च्या वर गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पुढील वर्षी निकालानंतर घेतला जाईल असे घोषित केले.

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने याप्रसंगी 1) तांदूळ 50 kg 2)साखर 50 kg 3) तुरदाळ 10 Kg 4) गहू 60 Kg 5) पाच लिटर तेल 6) चहा पत्ती 1 kg 7) डिटर्जंट सोप बॉक्स 1 इत्यादी साहित्य वस्तीग्रहाचे अध्यक्ष धावडे सर वस्तीगृहातील विद्यार्थी यांना वितरण करण्यात आले याप्रसंगी. सतीश माळी सर कोऑर्डिनेटर संपर्क संस्था ही उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पठाण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन  खरात सर यांनी केले त्याचप्रमाणे जेवण व्यवस्था साफसफाई फलक लेखन किचन डिपारमेंट या सर्वांनी नियोजनाप्रमाणे उत्तम काम करून कार्यक्रम यशस्वी करण्यात खारीचा वाटा उचलला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!