ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये “अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन” जल्लोषात साजरा..

उपस्थित मान्यवर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करून भारत मातेचा जयघोष झाला .विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली .

Spread the love

स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये “अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन” जल्लोषात साजरा..

आवाज न्यूजः राजेश बारणे तळेगाव दाभाडे  प्रतिनिधी 16 ऑगष्ट 

श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद स्कूल मध्ये आज सोमवार दिनांक 15/08/2022 रोजी भारताचा 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरी क्लब आॕफ तळेगाव एम.आय.डी.सी.चे अध्यक्ष  विल्सेन सालेर,श्री  डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. संतोषजी खांडगे, उपाध्यक्ष. दादासाहेब उ-र्हे ,कार्याध्यक्ष . बाळासाहेब शिंदे, संचालक.विलास काळोखे, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल च्या शालेय समिती सल्लागार . शबनम खान मॅडम ,रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. चे रो.प्रवीण भोसले(सचिव),रो.योगेश शिंदे ,रो.सचिन कोळवणकर,रो.शंकर हदिमनी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करून भारत मातेचा जयघोष झाला .विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली .प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीताने केली.
सदर कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे रोटरी क्लब आॕफ तळेगाव एम.आय.डी.सी.चे अध्यक्ष मा.श्री.विल्सेन सालेर यांचा स्वागतपर सत्कार श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे यांनी केला.उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार शालेय मुख्याध्यापिका मा.सौ.शमशाद शेख मॕडम,पर्यवेक्षिका मा.सौ. रेणू शर्मा मॕडम यांनी केला.

शाळेच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर करून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना मानवंदना दिली.
अमृतमहोत्सवी दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दी. 13आॅगस्ट ते 15आॅगस्ट पर्यत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनावर वक्तृत्व, गीत गायन, देशभक्तीपर गीते, नाटक, कवायत, विविध नेत्यांच्या वेशभूषा द्वारे व्यक्तिमत्व परिचय याविषयी समर्पक माहिती विद्यार्थ्यांनी सादर केली.

इयत्ता आठवीतील कु.सुरक्षा कटरे या विद्यार्थिनीने स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती सांगितली.
स्वातंत्र्यदिना निमित्त आपले मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरी क्लब तळेगाव MIDC चे अध्यक्ष श्री.विल्सेन सालेर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन चारित्र्यसंपन्न व चारित्र्यशील विद्यार्थी घडावे ,याकरिता मार्गदर्शन केले .देशातील प्रगती व उन्नती ही देशाचे भविष्य असणारे विद्यार्थी यांच्या योगे होते आणि देश महासत्ता बनेल यात शंका नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

श्री.डोळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे यांनी आपल्या वक्तव्यातून शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहत त्यांचे बलिदान वाया न जाऊ देता आपल्या भारताला आपण महासत्ता बनवू असा संकल्प व्यक्त केला. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य केले जाईल अशी ग्वाही देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिक. शमशाद शेख मॅडम, पर्यवेक्षिका सौ.रेणू शर्मा मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका सौ.धनश्री पाटील यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!