ताज्या घडामोडी

भाजपच्यावतीने सोमाटणे फाटा ते कामशेत अशी भव्य तिरंगा रॅली संपन्न ..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त भाजपच्यावतीने सोमाटणे फाटा ते कामशेत अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.

Spread the love

 राजकीय

भाजपच्यावतीने सोमाटणे फाटा ते कामशेत अशी भव्य तिरंगा रॅली संपन्न ..

आवाज न्यूजः मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.१४ प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त भाजपच्यावतीने सोमाटणे फाटा ते कामशेत अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.

भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली व मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे व जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे व विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांच्या प्रमुख संयोजनातून सोमाटणे फाटा ते कामशेत अशी भव्य तिरंगा रॅली अत्यंत उत्साहामधे पार पडली.

भारत माता की जय ! ! वंदे मातरम ! ! च्या घोषणा व फटाक्यांची अतिषबाजी करत मंगलमय वातावरणात भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने सोमाटणे फाटा ते कामशेत अश्या भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहाने स्वतःची टू व्हीलर व त्यावर तिरंगा ध्वज लाऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सोमाटणे फाटा येथून या रॅलीस सूरवात करून पुढे तळेगाव शहर,वडगाव, कान्हे फाटा,नायगाव व कामशेत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रमुख मान्यवरांच्या भाषणाने रॅलीचा शेवट करण्यात आला. याप्रसंगी हर घर तिरंगा अभियान संयोजक गुलाबराव म्हाळसकर,ज्येष्ठ नेते माऊली मामा शिंदे,राजाराम मामा शिंदे,प्रशांत आण्णा ढोरे,शांताराम कदम,तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, वडगाव शहराध्यक्ष अनंता कुडे,युवा नेते गणेश ठाकर,रवि शेटे यांच्यासह सर्व आघाड्यांचे,भागाचे,गणाचे अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!