ताज्या घडामोडी

सरकार कडे वारंवार पेन्शन धारक नागरिकांची पेन्शन वाढ करावी.. राष्ट्रीय अध्यक्ष  कमांडर  अशोकराव राऊत..

पाच वर्षां पासुन करत आले आहेत, परंतु अजून काही पेन्शन धारक नागरिकांचा प्रश्न काही सुटला नाही.

Spread the love

आवाज न्यूज: हर्षल अल्पे, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी.७ ऑगष्ट 

EPS -95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे(पेन्शन धारक) राष्ट्रीय अध्यक्ष  कमांडर  अशोकराव राऊत यांनी केंद्र सरकार कडे वारंवार पेन्शन धारक नागरिकांची पेन्शन वाढ करावी, अशी मागणी गेली पाच वर्षां पासुन करत आले आहेत, परंतु अजून काही पेन्शन धारक नागरिकांचा प्रश्न काही सुटला नाही.

यामुळे कमांडर साहेब यांनी दि.8/8/2022 रोजी दिल्ली मधील रामलिला मैदानावर आंदोलन करण्याचे आव्हान केल्यामुळे, भारतातील पेन्शन धारक नागरिक आपापल्या राज्यातून दिल्लीला आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. अशाच प्रकारे आपल्या पिंपरी-चिंचवड परिसरातील EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती मधील पदाधिकारी व पेन्शन धारक नागरिक आज पुणे रेल्वे स्टेशन येथून दिल्लीला जाण्यास रवाना झाले. यावेळी  दिल्लीला येणार्या पेन्शन धारक नागरिकांची रेल्वे स्टेशन मध्ये हजेरी घेऊन खात्री केली. EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती पिंपरी-चिंचवड शहर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!