ताज्या घडामोडी

पिकविमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी.

१६ आॕगष्ट पर्यत मुदतवाढ करावी आशी मागणी कुसगाव विकास सोसायटी , औंढे विकास सोसायटी , भाजे विकास सोसायटी सदय्य , आजी माजी चेेेेेेअरमन ,शेतकरी यांनी केली आहे .

Spread the love

पिकविमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी.

आवाज न्यूज प्रतिनिधी ३० जुुुलै.लोणावळा मच्छिंद्र मांडेकर प्रतिनिधी.

पिकविमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी काही शेतकऱ्यांनी केलीपाण्यात
या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. पाऊस सुरूवातीला धोधो परसला. अनेक जिल्हाचे शहरातून , गावोगावी पूर आले.पुरातून सुमारे ११० लोणांचा , तसेच शेकडो जनावरे , यांचा बळी गेला. शेतातील माती , रोपे वाहून गेली. आतिवृष्ठीने कोवळी रोपे पाण्यात होती.त्यामुळे रोपे कुजून गेली. शेते ओसाड पडली..
आशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला.. जगायचं कसं ? असा प्रश्न त्याचेपुढे आ वासून उभा राहिला आहे.

पीकविमा काढण्यासाठी ता.३१ अंतिम मुदत दिली आहे.या पार्वभूमिवर हजारो शेतकऱ्यांनी आद्याप पीकविमा कसा , कोठे भरायचा याची कल्पना नसल्यामुळे नव्वद टक्याःवर शेतकऱ्यांनी तो भरला नाही.
याबाबत विकास सोसायटी चे सचिव हे फाॕर्म कृषि अधिकारी यांचेकडे आहेत , आसे सांगतात.तसेच यापूर्वी अनेक वर्षे पीकविमा भरूनही कुणाला नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही..

याबाबत शासनाने चौकशी करावी .पीककर्ज वाटप करताना कापून घेतलेल्या रकमेतून ;जर शेतक-यांचे पीकविम्याचे फाॕर्म जर भरून दिले नसेल;तर नुकसान भरपाई कशी मिळणार ? असा काही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे..
चांगल्या प्रकारे जनजागृती व्हावी म्हणून व शंभर टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा भरावा , यासाठी ता.१६ आॕगष्ट पर्यत मुदतवाढ करावी आशी मागणी कुसगाव विकास सोसायटी , औंढे विकास सोसायटी , भाजे विकास सोसायटी सदय्य , आजी माजी चेेेेेेअरमन ,शेतकरी यांनी केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!