ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे येथे खंडणी न दिल्याने दुकानदाराला मारहाण, चार जणांना अटक..

रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली.

Spread the love

तळेगाव दाभाडे येथे खंडणी न दिल्याने दुकानदाराला मारहाण, चार जणांना अटक

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथे खंडणी न दिल्याने दुकानदाराला मारहाण करत जबरदस्तीने खिशातील ५ हजार रुपये हिसकावून नेल्याची घटना बुधवारी (दि. २७) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली.

याप्रकरणी जय प्रवीण भालेराव (वय १८, रा. तळेगाव दाभाडे), कुमार सुरेश मोहिते (वय १९, रा. तळेगाव दाभाडे), हर्ष प्रमोद साठे (वय १९, रा. वराळे, ता. मावळ) व अनिल सुरेश मोहिते (वय २१, रा. समता कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांना अटक करण्यात आली असून हरीश पप्पू शर्मा (वय २४, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे तळेगाव दाभाडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आईसक्रीमचे दुकान आहे. बुधवारी रात्री ११ वाजता आरोपी फिर्यादी यांच्या दुकानात आले असता, आरोपींनी हप्त्याची मागणी केली. हप्ता न दिल्याने आरोपींनी दुकानातील वस्तूंची तोडफोड करून कामगारांना मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या खिशातील ५ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केली असून तळेगाव दाभाडे पोलीस पुढिल तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!