ताज्या घडामोडी

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या ९६ वे पुण्यस्मरण यानिमित्ताने समर्थ विद्यालयात गुरुवर्य अण्णासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन…

गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकरांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या सहाय्याने पारतंत्र्याच्या काळात १९०६ साली राष्ट्रीय शिक्षणाचे सूत्र हाती घेऊन महाराष्ट्रातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण देणारे नवीन समर्थ विद्यालय स्थापन केले.

Spread the love

 

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या ९६ वे पुण्यस्मरण यानिमित्ताने समर्थ विद्यालयात गुरुवर्य अण्णासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.

११६ वर्षांपासून अविरतपणे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात मावळ तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगोत्री उपलब्ध करून देणारे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आज पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणा पर्यंतचे असंख्य दालने विद्यादानाचे पवित्र कार्य करत आहेत.

केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता विद्यार्थ्यांमधील अंगभूत गुणांना ओळखून त्यांना स्वयम् विकसित होण्याची संधी पोषक वातावरण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे कार्य नवीन समर्थ विद्यालय करत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधी सुभाष चंद्र बोस यांसारख्या राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांनी नवीन समर्थ विद्यालयात वारंवार भेटी देऊन या विद्यालयात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभक्ती चे धडे दिले आहेत. गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकरांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या सहाय्याने पारतंत्र्याच्या काळात १९०६ साली राष्ट्रीय शिक्षणाचे सूत्र हाती घेऊन महाराष्ट्रातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण देणारे नवीन समर्थ विद्यालय स्थापन केले.

मातृभाषेतून अध्ययन, उपासनेस आणि व्यवसाय शिक्षणास प्राधान्य देणारे हे विद्यालय नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेची ही प्रथम शाळा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या संस्थेचे प्रथम अध्यक्ष आहे. तर गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर हे संस्थापक चिटणीस पारतंत्र्याच्या काळात राष्ट्रीय चळवळीस हातभार लावणारी आणि देशभक्त या विद्यालयाने घडविले क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे या नवीन समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!