ताज्या घडामोडी

तळेगाव मधील खड्डे व तळेगाव चाकण रोडवरील सततची होणारी ट्रॅफिक बद्दल समस्या सोडविण्यात आली नाही तर रास्ता रोको  करण्याचा मनसेचा ईशारा..

तळेगाव दाभाडे नगरपरिषदीचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना देण्यात आले निवेदन...

Spread the love

तळेगाव मधील खड्डे व तळेगाव चाकण रोडवरील सततची होणारी ट्रॅफिक बद्दल समस्या सोडविण्यात आली नाही तर रास्ता रोको  करण्याचा मनसेचा ईशारा..

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, १९ जुलै  मनसे जिल्हा अध्यक्ष सचिन भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे नगरपरिषदीचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची भेट घेऊन त्यांना तळेगाव मधील खड्डे व तळेगाव चाकण रोडवरील सततची होणारी ट्रॅफिक बद्दल, निवेदन देण्यात आले. आठ दिवसांत समस्या सोडविण्यात आली नाही तर रास्ता रोको  करण्यात येईल. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

लौकरात लौकर सर्व रस्ते दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन  तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  विजयकुमार सरनाईक   यांंनी दिले.

ह्या प्रसंगी रस्ते साधन सुविधा व आस्थापना चे तळेगाव शहर अध्यक्ष निरज कुलकर्णी तसेच सचिव किरण नलावडे सहसचिव पंकज हत्ते महाराष्ट्र सैनिक प्रथमेश आगळे, संदीप पाटोळे, देविदास चव्हाण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!