ताज्या घडामोडी

रणजीत काकडे मित्र परिवारातर्फे गुरु पौर्णिमा साजरी….

गुरु शिष्याचे पवित्र नाते हे अगदी अनादी कालापासून आहे, गुरु द्रोणाचार्यांच्या एका शब्दाखातर शिष्य असणाऱ्या एकलव्याने त्यांना स्वतःचा अंगठा कापून दिलेला होता असेही गुरु शिष्याचे नाते नवीन पिढीला सुद्धा कळायला हवे.

Spread the love

रणजीत काकडे मित्र परिवारातर्फे गुरु पौर्णिमा साजरी.

आवाज न्यूज:तळेगाव दाभाडे १५ जुुुलै गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
गुरु शिष्याचे पवित्र नाते हे अगदी अनादी कालापासून आहे, गुरु द्रोणाचार्यांच्या एका शब्दाखातर शिष्य असणाऱ्या एकलव्याने त्यांना स्वतःचा अंगठा कापून दिलेला होता असेही गुरु शिष्याचे नाते नवीन पिढीला सुद्धा कळायला हवे.

लहान मूल जेव्हा शाळेत जाते त्यावेळेस नक्की समाजामध्ये आपण कसे वागावे तसेच जी आपली एक वेगळी आगळी प्रतिमा तयार होत असते ती आपल्या गुरूमुळेच होत असते.
नुकतेच गुरुपौर्णिमेनिमित्त तळेगाव दाभाडे येथील रणजीत काकडे मित्र परिवारातर्फे तळेगाव स्टेशन येथील शाळा क्रमांक सहा या शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली त्याप्रसंगी तळेगाव दाभाडे येथील यशस्वी उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्या संकल्पनेतून शाळा क्रमांक सहा येथील शिक्षकांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी रणजीत काकडे मित्र परिवाराचे गोरख काकडे, गणेश गरुडे ,अमोल निलक , सुमित जाधव व इतर मित्रपरिवार उपस्थित होते .
गुरुचे महत्व हे जीवनात आपणास एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत असते असे सांगताना तेथील मुख्याध्यापक अमोल पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संयोजन रणजीत काकडे मित्र परिवारातर्फे करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षकांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!