ताज्या घडामोडी

अंत्यसंस्कार  करण्यासाठी, जागा उपलब्ध नसल्याने, मृत्यू झालेल्या महिलेचा अंत्यविधी  अखेर निवारा शेडमध्ये.

Spread the love

आवाज न्यूज:तळेगाव १४ जुलै, तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशान भूमी मध्ये आज तळेगाव मध्ये चार जणांचे मृत्यू झाले, त्यामुळे अंत्यसंस्कार (सरण रचण्यासाठी)   करण्यासाठी, तीनच जागा उपलब्ध असल्याने, चौथ्या मृत्यू झालेल्या महिलेचा अंत्यविधी  अखेर निवारा शेडमध्ये करण्यात आला.:

रोटरी क्लब ऑफ तळेगाव यांनी नगरपालिकेला दान केलेली गॅस वाहिनी बंद असल्यामुळे देखील लोकांच्या अडचणी होत आहे. एक लाखाच्या जवळपास गेलेली लोकसंख्या, कोरोना काळ, मृत्यूचे प्रमाण, जोरात पडत असलेला पाऊस, व त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय, यामध्ये प्रशासनाकडून उपाय योजना होणार का? हे पाहणे पुढील काळात महत्वाचे ठरणार आहे.

या अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!