ताज्या घडामोडी

अतिवृष्टीचा इशारा… सर्व शाळांना सुट्टी जाहीर..

हवामान खात्याने पुढील दोन दिवसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या दोन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Spread the love
अतिवृष्टीचा इशारा… सर्व शाळांना सुट्टी जाहीर

  आवाज न्यूज:पुणे प्रतिनिधी १३ जुलै

पुणे आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. येत्या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवडमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज (बुधवार) आणि गुरुवार (दि. 14) दोन दिवस शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

मागील काही दिवसांपासून पिंपरी – चिंचवड शहरात पाऊस  वाढला आहे. शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने सखल भागात पाणी साचले आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील दोन दिवसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या दोन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच सर्व खाजगी शांळांना (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित) आज (बुधवार) व गुरुवार (उद्या) सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिले

आहेत
.तसेच मावळातील देखील शाळा बंद..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!