ताज्या घडामोडी

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज मध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन

कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई) मध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय नृत्याविष्काराचा दर्जेदार कार्यक्रम ‘हेचि दान देगा देवा’ विद्यार्थ्यांनी उत्फुर्तपणे सादर..

Spread the love

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज मध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन

आवाज न्यूजः चिंचवड 11 कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई) मध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय नृत्याविष्काराचा दर्जेदार कार्यक्रम ‘हेचि दान देगा देवा’ विद्यार्थ्यांनी उत्फुर्तपणे सादर केला.

येथील परिसरातील नागरी भागात विद्यार्थ्यांनी पायी दिंडी काढत टाळ व मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष केला करीत सर्वांचे अनेकांचे लक्ष वेधले आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य व शांती लाभो अशी प्रार्थना विद्यार्थी व शिक्षकवृदांनी केली. कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार भूपाली शहा यांच्यासूचनेनुसार विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅव्हिस यांच्या नेतृत्वाखाली आळंदी देवाची येथील संचलित महालक्ष्मी नारायण वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नागेश महाराज भेंडे, डान्स कोरियोग्राफ़र दिनेश पटेल, शुभम, विजय गायकवाड, संगीत शिक्षिका नेहा नाफ़डे, शिक्षक अथर्व शिंदे, अभिजीत डोंगरे यांनी कार्यक्रमात आपले मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमास पालक वर्ग देखील मोठ्यासंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. सदर कार्यक्रम योग्यरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिकांनी आपले बहुमोल योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!