ताज्या घडामोडी

बुलेट तसेच इतर दुचाकी वाहने कर्कष आवाज करणारे ,तसेच जोरात फटाके वाजविणे, असे बेकायदेशीररित्या कृत्य करुन लोकांना त्रास देणा-या बुलेट गाडी.

Spread the love

पोलीस उप आयुक्त वाहतुक पुणे शहर, यांनीबुलेट तसेच इतर दुचाकी वाहने कर्कष आवाज करणारे यांच्यावर जोरदार कारवाई!!!

आवाज न्यूज: प्रतिनिधी पुणे ,२२जुलै २०२२   पोलीस उप आयुक्त वाहतुक पुणे शहर, यांनी ॲड. श्वेता वाय यांना दिलेले पत्र, उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, आपण आपले सरकार या पोर्टलवर बुलेट तसेच इतर दुचाकी वाहने कर्कष आवाज करणारे तसेच जोरात फटाके वाजविणे असे बेकायदेशीररित्या कृत्य करुन लोकांना त्रास देणा-या बुलेट गाडी पुणे परिसरात संख्या वाढत चालली आहे त्याचा त्रास महिला वर्ग, वृध्द वर्ग तसेच लोकांना सदर आवाजाचा त्रास होत आहे त्यमुळे अश्या बेकायदेशीर बुलेट चालकांवर कायदेशीर कारवाही करण्यात यावी असा तक्रारी अर्ज इकडील कार्यालयास प्राप्त झाला आहे.

सदर अर्जाचे अनुषंगाने  कर्कष आवाज करणा-या बुलेट / दुचाकी वाहनांवर खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेल्या आहेत. व दंं ठोठावण्यात आला आहे.

जाक्र/पोउआ/वाहतुक पोनिप्रशा/3739/२०२२ पोलीस उप आयुक्त वाहतुक पुणे शहर दिनांक ०४/०७/२०२२

विषय आपले सरकार / Dist / PLPN / १२४४२ / २०२२ अन्वये

२०२१/  १६,२०० रक्कम रू .  २०२२  /  २३,००० रक्कम रू

तसेच यापुढे देखील करकर्ष आवाज करणा-या बुलेट / दुचाकी वाहनांवर कारवाई करणेबाबत सर्व वाहतूक विभागाना तोंडी सुचना देण्यात आलेल्या आहेत.

मा. पोलीस उप आयुक्त, वाहतूक, यांचे आदेशान्वये

Ju ए.एस. तोरडमल पोलीस निरीक्षक प्रशासन वाहतूक शाखा, पुणे शहर.   यांच्याकडून सदरची कारवाई करण्यात आली आहे.

अशी माहिती अॅ डव्होकेट श्वेता वाय यांनी आवाज न्यूज ला दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!