ताज्या घडामोडी

गणेश चाळके, हा विवाहीत तरूण रेल्वेरूळ ओलांडताना आपघातात ठार.

Spread the love

गणेश चाळके हा विवाहीत तरूण रेल्वेरूळ ओलांडताना आपघातात ठार.

आवाज न्यूज: लोणावळा ता.४ मच्छिंद्र मांडेकर (प्रतिनिधी )     लोणावळा डोंगरगाववाडी येथील शिवसेना विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी व साईबाबांचा भक्त गणेश नथुराम चाळके (वय-४२) या विवाहीत तरूणाचा रेल्वेरूळ ओलांडताना आपघातात मृत्यू झाला. त्यांचे पश्चात आई , पत्नी , एक विवाहीत भाऊ , तीन विवाहीत बहिणी , दोन लहान मुली , भावजय असा परिवार आहे.

कै.गणेश चाळके हा भांगरवाडी येथील श्री साईबाबा पायी पालखी सेवा मंडळाचा माजी आध्यक्ष व बावीस वर्षपासून सक्रीय सदय्य होता. त्यामुळे त्याचा जनसंपर्क दांडगा होता. कामगारनेते प्रसाद नथूराम चाळके हे त्यांचे थोरले भाऊ होत. डोँगरगाव चे विद्यमान सदय्य व माजी सरपंच भाऊसाहेब भिवडे हे त्यांचे दाजी (बहीणीचे पती ) होत.
हकीगत : शनिवारी ता.२ रोजी दुपारी साडेबारा ते एक दरम्यान केवरे वसाहत येथे रेल्वेगेटवर रूळ ओलांडताना मालगाडीचे मधून जात असताना अचानक मालगाडी सुरू होऊन त्याखाली गणेश चाळके हा जागीच ठार झाला. त्याचे आकस्मिक मृत्यूची वार्ता वा-यासारखी पसरताच डोंगरगाववाडी , केवरे गावावर शोककळा पसरली .लहानथोर , महिला , पुरूष , मिञपरिवार यांचेकडून हळहळ व्यक्त होत होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!