ताज्या घडामोडी
शरद पवार यांच्या एकनाथ शिंदेंना शुभेच्छा !!
अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे. शरद पवार .
शरद पवार यांच्या एकनाथ शिंदेंना शुभेच्छा !!
आवाज न्यूज: मुंबई l राज्याच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणामुळे अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे,” असे शरद पवार म्हणाले.




