ताज्या घडामोडी

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री व विधानपरिषद सदस्यत्व पदाचा राजीनामा…!l

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन.

Spread the love

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री व विधानपरिषद सदस्यत्व पदाचा राजीनामा…!

आवाज न्यूज मुंबई: अखेर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री व विधानपरिषद सदस्यत्व पदाचा राजीनामा…!
मुंबई : राज्यात मागील २१ जून पासून सत्तासंघर्ष उभा राहिला होता. त्या सत्तासंघर्षचा आज एक अध्याय संपला असे दिसून येत आहे. आज माध्यमाच्या समोर येऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा ही राजीनामा देत असल्याची मोठी घोषणा केली आहे.

आता यापुढे मी फक्त शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाचीच धुरा सांभाळणार असल्याचेही त्यांनी माध्यमाच्या समोर स्पष्ट केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना बंडखोर आमदारंवर जहरी टिका केली आहे. त्यांना जसा आनंद उत्सव साजरा करायचा आहे तसा करुद्या पण त्यांना कोणत्याही शिवसैनिकांनी अडवू नका असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा एवढेच नाही तर त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा ही राजीनामा मिलिंद नार्वेकर व निलमताई गोऱ्हे, यांच्या हस्ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येईल

उ द्धव ठाकरे यांच्या राजीनाम्या नंतर मात्र भाजपाच्या गोटात

मोठा आनंदउत्सव साजरा होताना दिसत आहे.

“उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन.”

पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उद्या भाजपला बहुमत सिद्ध करावे लागणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!