ताज्या घडामोडी

वडगाव शहर भाजपाच्या, वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप lll

वडगाव शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील डेक्कन हिल्स जवळील ठाकरवाडी येथे असलेल्या शाळेत हा उपक्रम संपन्न !!

Spread the love

वडगाव शहर भाजपाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप lll

आवाज न्यूज: वडगाव मावळ दि.२८/६/२२ नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना लक्ष्य अंत्योदय प्रण अंत्योदय या भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेतून भाजपाचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांच्या संकल्पनेतून (वाढदिवसानिमित्त)जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.वडगाव शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील डेक्कन हिल्स जवळील ठाकरवाडी येथे असलेल्या शाळेत हा उपक्रम घेण्यात आला.  शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात दिली.

यावेळी नगरसेवक प्रविण चव्हाण,किरण म्हाळसकर, भूषण मुथा,माजी नगरसेवक अॅड. विजय जाधव, प्रसाद पिंगळे, रविंद्र काकडे यांच्यासह मा सरपंच नितीन कुडे,मा अध्यक्ष नारायणराव ढोरे,किरण भिलारे, सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर, मकरंद बवरे, , महेंद्र म्हाळसकर, कल्पेश भोंडवे, सोमनाथ पवार आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात नारायण ढोरे, प्रसाद पिंगळे,किरण म्हाळसकर आदिंनी मनोगत व्यक्त केले. माळी सर यांनी  सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत  केले.कल्पेश भोंडवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ,विनायक भेगडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!