आंबे , करवंदे , जांभळे आणि रानभाज्या विक्री करणाऱ्यांची लोणावळा मंडईत रांगा ..
आंबे , करवंदे , जांभळे आणि रानभाज्या विक्री करणाऱ्यांची लोणावळा मंडईत रांगा ..
आवाज न्यूज:लोणावळा ता.२६(प्रतिनिधी )आंबे , करवंदे , जांभळे आणि रानभाज्या विक्री करणाऱ्यांची लोणावळा मंडईत रांग पहायला मिळाली.. रायवळ पिवळेधमक आंबे ,हिरवे पिवळसर आढीचे गावरान आंबे , टपोरी जांभळे , काळी करवंदे आणि रानभाज्या विक्री करणारे कोकणातील व मुळशीतील आदीवासी , कोळी , मराठी माणसे , महिला , मुले बाजारात विक्री साठी साठी माल घेवून आल्याचे पहायला मिळाले.. पन्नास , साठ रूपये डझन आंबे , दहा रूपयाला चाईत , घोट्याल , कोळेची , ढाप्याची कड्या कपारीला असलेली जाळीमधे झाडावर असलेल्या वेलाची भाजी आरोग्य दृष्टीने अतिशय फायदेशीर असून त्यामुळे साईड इफेक्टऐवजी शरिराचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. शरिरात प्रतिकारशक्ती वाढते , असे येथील विक्रेते सांगतात..त्यामुळे सकाळी सकाळी आलेले हे रानभाज्या आणि रानातील फळे विक्रीसाठी येतात. सर्वजण सायंकाळी सहापर्यत विकून बाजारहाट घेवून घरी जातात.



